ब्रेकिंगराजकिय

शिरूरच्या ऊपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव : संपूर्ण घडामोडी

आता शिरूर नपाच्या सत्तेत भाजप पण ?

0 0 8 4 7 4

शिरूर नगरपरिषदेचे ऊपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव मंजूर : नेमक्या कशा घडल्या घडामोडी ?
——
शिरूर : दि. 30/10/2026.
बातमी प्रतिनिधी : रविंद्र खुडे.
——
पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन अवघे आठ महिने झाले आहेत. यात एकूण 21 नगरसेवक निवडून आलेले होते. मात्र भाजप पुरस्कृत पॅनलचे सर्वाधिक म्हणजे 11 नगरसेवक निवडून आले होते. तरीही त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले होते. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या गटाचे 7 नगरसेवक निवडून आले होते. तसेच माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या गटाचे 5 नगरसेवक निवडून आले होते आणि 1 अपक्ष असे एकूण 24 नगरसेवक प्रत्यक्ष निवडून आलेले होते. तर थेट जनतेतून नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला (विद्यमान आमदार पॅनल) मिळालेले होते.
तर 3 पक्षांचे (गटांचे) प्रत्येकी एकेक नगरसेवक कॉप मधून घेण्यात आल्याने एकूण नगरसेवकांची संख्या ही 27 + 1 नगराध्यक्ष असे एकूण 28 अशी संख्या होती.

त्यानंतर ज्यावेळी विषय समित्यांची निवड प्रक्रिया झाली, त्या मतदान प्रक्रियेत 1 मत हे नगराध्यक्षाचे अधिक असते व त्याचा वापर नगराध्यक्ष निर्णायक मत म्हणून वापरत असतात. म्हणजे विषय समित्या व इतर मतदानावेळी नगरध्यक्षाना कायद्याने दोन मते देता येतात.

शिरूर नगर परिषदेची निवडणूक होऊन अवघे आठ महिनेच झालेत. तर लगेच ऊपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव, 30/10/2026 रोजी सकाळी 11.00 वा. शिरूर नगर परिषदेत 20 मतांनी मंजूर झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून आच्छर्य व्यक्त होत आहे, की नेमके काय घडले असावे की ऊपनगराध्यक्ष पदावर एवढ्या लवकर अविश्वास ठराव घेतला गेला ?

या अविश्वास ठरावावेळी मात्र ऊपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यासह त्यांच्या गटातील 5 नगरसेवक व त्यांच्या गटाचा 1 स्वीकृत नगरसेवक अशा सहा जणांनी सभागृहाच्या बाहेर निघून जात सभात्याग केला. त्यामुळे पत्रकारांना तात्काळ गादिया यांच्याशी प्रत्यक्ष भेटता न आल्याने याबाबत त्यांना फोनवरून विचारले असता, “हा अविश्वास ठराव मला मान्य नसून, आमच्या नेत्यांना विचारून येत्या 2 नोव्हेंबर रोजी आमचे मत आम्ही जनतेसमोर व पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत” असे सांगितले. मात्र “ते नेते कोण ?” हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले असून, प्रत्यक्षात पत्रकारांना भेटण्याचेही टाळत 2 तारखेला स्पष्ट करू असे सांगितले आहे. तर त्यांचे बंधू यांनी सोशल मीडिया वर पोस्ट टाकत स्पष्ट केलेय की, हा अविश्वास ठराव नसून… विश्वास घातकी ठराव आहे…

त्यामुळे या सर्व घडामोडिंनंतर या गटाचे एकूण 5 नगरसेवक हे सध्या सत्तेत असूनही नसल्यासारखे झालेले आहे.

कारण नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडून आलेले असून, त्या पदावर सौ ऐश्वर्या अभिजित पाचर्णे या निवडून आल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विषय समित्यांच्या सभापती, ऊपसभापती निवडीवेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत एकच गट स्थापन केलेला होता. त्यामुळे घटनात्मक दृष्ट्या ते दोन्ही गट सध्यातरी एकत्र आहेत.

त्यामुळे आता सध्या तरी केवळ ऊपनगराध्यक्ष पदाचाच अविश्वास ठराव घेतल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हा माजी आमदार अशोक बापू पवार पुरस्कृत पॅनलच्या बाकी सभापती, ऊपसभापती, विषय समित्यांचे सदस्य यांच्या पदांना सध्या काही धोका नसून, पुढील काही दिवसांत या गटाचे चित्र आणखी स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे शिरूर नगर परिषदेवर आता तिन्ही पक्षांची सत्ता निर्माण झाल्याचे चित्र आहे. कारण जरी भाजपने आधीच सत्ताधारी गटाला तसेच नगराध्यक्षांना पाठिंबा दिला असला व त्यानंतर उपनगराध्यक्षांचा अविश्वास ठराव मंजूर झाला असला, तरी देखील भाजपला सध्यातरी सभापती, ऊपसभापती पद घटनात्मक दृष्ट्या मिळणार नसल्याने, भविष्यात भाजप ऊपनगराध्यक्ष पदावर दावा करू शकते आणि जर राष्ट्रवादीचा नाराज गट सत्तेतून बाहेर पडला, तरच भाजपला विषय समित्यांचे सभापती, ऊपसभापती, सदस्य पदे मिळू शकतील.

त्यामुळेच शिरूर नगर परिषदेत चाललेल्या घडामोडी या कुणा कुणाच्या ईशाऱ्यावर चालल्यात ? हे येत्या दोन तारखेला व त्यानंतर शिरूर नपा वर कार्यरत असलेल्या बॉडीच्या वर्षपूर्ती नंतर कळू शकेल.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार मितेश गादीया यांचे असमाधान कारक काम, कारभारात मनमानी, इतर नगर सेवकांना विश्वासात न घेणे, एकतर्फी निर्णय घेणे, सभागृहात किंवा कार्यालयात सहकारी नगरसेवक व कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करणे, प्रभागांच्या विकास कामांसाठी येणाऱ्या निधीचे सामान किंवा योग्य वाटप न करता राजकीय हेतूने पक्षपाती भूमिका घेउन निधी वाटपात भेदभाव करणे. तसेच प्रभागातील व शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये वारंवार अडथळे निर्माण करणे किंवा दुर्लक्ष करून आर्थिक बाबी व विकासात्मक कार्याला खीळ बसविणे. हे ठपके ठेऊन त्यांच्यावर अविश्वास ठराव बहुमताने घेण्यात आल्याचे समजते आहे.

या आशयाचे पत्र 26/10/2026 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शिरूर नगर परिषदेला प्राप्त झाले होते. त्यावर भाजप व राष्ट्रवादी च्या अशा मिळून 19 जणांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
अशा हालचाली व सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक सुरु असल्याचे मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर शिरूरकरांना किंचित जाणवू लागले होते.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 4 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे