आरोग्य व शिक्षण

दामिनी पथक कार्यान्वित करण्याची नगरसेविका सय्यद यांची मागणी

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नगरसेविका सय्यद सरसावल्या

0 0 8 2 3 4

*शिरूर शहरात महिला सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ सुरू करण्याची नगरसेविका आयेशा सय्यद यांची मागणी*

शिरूर : दि. २९/०५/२०२६.

शिरूर शहरातील महिला, विद्यार्थिनी व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिरूर शहरात विशेष ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कलीम सय्यद यांनी लेखी पत्राद्वारे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्याकडे केली आहे.

१४ जून २०२६ पासून यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा व महाविद्यालये सुरू होत असल्याने, शिरूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, मुख्य रस्ते व बाजारपेठांमध्ये विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून काही ठिकाणी छेडछाड व गैरवर्तनाच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे दामिनी पथकाने नियमित गस्त घालून महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक शिरूर, मुख्याधिकारी शिरूर नगर परिषद, वाहतूक विभाग शिरूर तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती, महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा सय्यद यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे