शिरूरला NPDS अंतर्गत 30 लाखांचा गांजा जप्त : पोपट शितोळे ला अटक
LCB व शिरूर पोलिसांची कारवाई

*शिरूरमध्ये 61 किलो गांजा जप्त : स्कॉर्पिओसह 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक*
——-
शिरूर : दि. 23/09/2026.
बातमी प्रतिनिधी : रविंद्र खुडे, संपादक 9422 650 735..
——-
“नशामुक्त भारत आणि ड्रग्स फ्री महाराष्ट्र” या उपक्रमांतर्गत, पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने 61 किलो गांजा आणि स्कॉर्पिओ कार असा एकूण 40 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोपट विठ्ठल शितोळे (वय ५२), रा. इचकेवाडी, कवठे येमाई, ता. शिरूर याला मुद्देमालासह त्याच्या राहत्या घरून दि. 23/09/2026 रोजी सकाळी 11.15 वा. अटक करण्यात आली आहे.
आरोपीने शिरूर – मंचर रोडलगत त्याच्या घरासमोर लावलेल्या स्कॉर्पिओ गाडी क्र. MH 12 HZ 0938 मध्ये विक्रीसाठी गांजा साठवला होता. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ६१ किलो गांजा मिळाला आहे. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय पाषाण यांनी, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा (कोल्हापूर परिक्षेत्र) तसेच पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या सहकार्याने पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार तुषार पंधारे, पोलीस अंमलदार संजय पडवळ, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ यांनी शिरूर पोलिसांच्या मदतीने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पी एस आय खटिंग हे करत आहेत.