गुन्हेगारी

पोलिसांनी शिरूरला पुन्हा ड्रग्ससह एकाला घेतले ताब्यात

शिरूर आणि शिरूरचे तरुण ड्रग्सच्या विळख्यात ?

0 0 8 2 3 4

 

*पुणे LCB व शिरूर पोलिसांनी पुन्हा पकडले एका ड्रग्स विक्रेत्याला*

——————————-
शिरूर : दि. 12/04/2026.
बातमी : रविंद्र खुडे, संपादक.
——————————-

स्थानीक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे शिरूर उपविभागातील पथक, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे नियंत्रण व अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला एक विधिसंघर्षित बालक हा मेफेड्रोन (MD drugs) या अमली पदार्थाची विक्री करण्याकरता शिरूर बायपास येथील बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेल जवळ येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदरची माहिती वरिष्ठांना कळवून वरिष्ठांचे सूचना व मार्गदर्शनानुसार, शिरूर पोलीस स्टेशनचे मदतीने सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई केली असता एक विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 1,38,800/- रु. किंमतीचा 6.94 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एम डी ) नावाचा अमली पदार्थ मिळून आला. सदरबाबत अधिक तपास स्था. गु. अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण व शिरूर पो स्टे करत आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गु र नं 321/26 एनडीपीएस ऍक्ट कलम 8(क ), 21(ब) सह बी एन एस कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पो स्टे चे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पो स ई शुभम चव्हाण, पो हवा. तुषार पंदारे, पो हवा जनार्दन शेळके, पो हवा राजू मोमीन, पो हवा संजू जाधव, पो हवा अक्षय कळमकर, पो अं नीरज पिसाळ यांनी केली आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे