शिरूर : पं स व जीप निवडणूक 2026 : माघारी नंतरच्या सर्व लढती व चिन्हे
5 तारखेला प्रचाराचा शेवट, 7 तारखेला मतदान तर 9 तारखेला कारेगावला मतमोजणी
शिरूर : जि प पुणे व पं स शिरूर सार्वत्रिक निवडणूक 2026 : सर्व गट व गणातील उमेदवार व त्यांची चिन्हे
—————-
शिरूर :- दि.05/02/2026.
बातमी : रवींद्र खुडे, संपादक.
9422 650 735..
—————-
जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिरूर सार्वत्रिक निवडणूक 2026 चे मतदान पूर्वी गुरुवार दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार होते, तर निकाल रविवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी लागणार होता. मात्र राज्याचे ऊपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे, राज्य सरकारच्यावतीने एक दिवस सुट्टी व दोन दिवस दुखवटा जाहीर करत, निवडणुकाही दोन दिवस लांबविलेल्या होत्या. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतदान हे शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून, मतमोजणी सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. शिरूर तालुक्याची मतदान पेट्यांची स्ट्रॉंग रूम ही कारेगाव MIDC मधील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या शासकीय गोदाम (गोडाऊन) येथे असून, सोमवारी मतमोजणी व निकाल तेथेच लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या अधीपत्याखाली ही निवडणुक प्रक्रिया होत असून, त्यासाठी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व त्यांचा संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्ग काम करत आहे. या निवडणुकीसाठी विविध खात्यांमधील एकूण 2186 कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे ग्रहविभागामार्फतही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला असून, शिरूर तालुक्यातील शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर या तीन पोलीस स्टेशनच्या कुमकिसह राखीव पोलीस तसेच होमगार्ड आपले कर्तव्य बजावणार असल्याचे, शिरूरचे ऊपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचे रूट मार्च देखील घेण्यात आलेय.
शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी महसूल प्रशासन व शिरूरचे ऊपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी ग्रहविभागामार्फत जनतेला आवाहन केलेय की, ही निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कुणीही कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
=======####======
शिरूर तालुक्यातील मुख्य लढती :-
निवडणुक प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे माघार व चिन्ह वाटप, हे मंगळवार दि. 27 जानेवारी 2026 रोजी झाले होते. त्याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटांसाठी असणाऱ्या एकूण 7 जागेंसाठी तब्बल 49 जणांनी अर्ज भरलेले होते. त्यातील 29 जणांनी माघार घेतली असून त्यापैकी काही अर्ज डमी, काही अपक्ष, तर काही पक्षांचे होते. माघारी नंतर जिल्हा परिषदेसाठी आता 20 उमेदवार रिंगणात असून, काही ठिकाणी जीप साठी थेट समोरासमोर दोघांमध्येच लढती आहेत तर काही ठिकाणी तिरंगी व चौरंगीही लढती होणार आहेत.
तसेच पंचायत समितिच्या 14 जागेंसाठी तब्बल 101 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 55 जणांनी माघार घेतली असून आता 46 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेले असल्याने, काही ठिकाणी समोरासमोर दोघांमध्ये, काही ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत..
त्या पुढीलप्रमाणे..
*जिल्हा परिषद :-*
*1) जीप गट कवठे येमाई, विभाग 14 : (आरक्षण सर्वसाधारण)*
*शिल्लक उमेदवारी अर्ज 4*
1) राजेंद्र पोपटराव गावडे (रा. टाकळी हाजी) – भाजप – चिन्ह कमळ.
2) दामू धोंडिबा घोडे (रा. टाकळी हाजी) – राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
3) बाळासाहेब अंकुश डांगे (रा. कवठे) – शिवसेना (उबाठा) – चिन्ह मशाल.
4) सुभाष रामराव पोकळे (रा. कवठे) – शिवसेना (शिंदे) – चिन्ह धनुष्यबाण.
———–
*माघार 2 :-*
1) मंगलदास विठ्ठलराव बांदल (रा. शिक्रापूर) – अपक्ष.
2) सौ मनीषा राजेंद्र गावडे (रा. टाकळी हाजी) – अपक्ष.
——–####——-
*2) जीप गट न्हावरा शिरूर ग्रामीण विभाग – 15 (आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला).*
*शिल्लक अर्ज 2*
1) श्रीमती मालती बाबुराव पाचर्णे (रा. तर्डोबाचीवाडी) – भाजप – चिन्ह कमळ.
2) वृषाली बबन वाळके (रा. करडे) – राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
———
*माघार 2 :-*
1) तृप्ती अजय सरोदे, रा. सरदवाडी, शिवसेना (शिंदे)
2) रेखा मंगलदास बांदल,(रा. शिक्रापूर) – अपक्ष.
——–####——-
*3) जीप गट रांजणगाव गणपती – कारेगाव विभाग 16 – (सर्वसाधारण – महिला)*
*शिल्लक अर्ज 2*
1) ज्योती मानसिंग पाचुंदकर (रा. रांजणगाव गणपती) – राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
2) स्वाती दत्तात्रय पाचुंदकर (रा. रांजणगाव गणपती) – भाजप – चिन्ह कमळ.
——–
*माघार 4 :-*
1) अर्चना बापूसाहेब शिंदे (रा. रांजणगाव गणपती) – शिवसेना (शिंदे).
2) अर्चना ज्ञानेश्वर पाचुंदकर (रा. खराडी) – अपक्ष
3) स्मिता चंद्रशेखर पाचुंदकर (रा. रांजणगाव गणपती) – अपक्ष.
4) नंदा निवृत्ती गावडे (रा. वाघाळे) – अपक्ष.
——–####—–
*4) जीप पाबळ गट – विभाग 17 (सर्वसाधारण).*
*शिल्ल्ल अर्ज 2*
1) विकास शिवाजीराव गायकवाड (रा. हिवरे) – भाजप – चिन्ह कमळ.
2) प्रफुल्ल काळुराम शिवले (रा. वढू बुद्रुक) – राष्ट्रवादी चिन्ह घड्याळ.
———
*माघार 4 :-*
1) मंगलदास विठ्ठलराव बांदल (रा. शिक्रापूर) – अपक्ष.
2) शंकर जिजाबा जांभळकर, रा. – (अपक्ष)
अमित तानाजी सोनवणे, रा. करंदी, (अपक्ष)
3) सचिन साहेबराव धुमाळ (रा. विमाननगर) – अपक्ष.
4) अंजली प्रफुल्ल शिवले, रा. वढू बु. ll – (अपक्ष).
——–####——
*5) जीप गट शिक्रापूर – विभाग 18 (सर्वसाधारण महिला)#*
*शिल्लक अर्ज 2*
1) मोनिका नवनाथ हरगुडे (रा. सणसवाडी) – राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
2) सीमा त्रीनयन कळमकर (रा. शिक्रापूर) – (अपक्ष) – चिन्ह – एअर कंडिशनर.
———
*माघार 3:-*
1) कुसुम बाळासाहेब खैरे, रा. शिक्रापूर (भाजप).
2) कुसुम धैर्यशील मांढरे, रा. शिक्रापूर, (अपक्ष).
3) मंगल सतीश सासवडे, रा. शिक्रापूर (अपक्ष).
———####——
*6) जीप गट तळेगाव ढमढेरे – विभाग 19, (सर्वसाधारण महिला)*
*शिल्लक अर्ज 4*
1) सारिका राहुल कर्पे (रा. टाकळी भीमा) – शिवसेना (शिंदे) – धनुष्यबाण.
2) दीपाली राहुल गव्हाणे (रा. डिंग्रजवाडी) – भाजप – चिन्ह कमळ.
3) रेखा मंगलदास बांदल (रा. शिक्रापूर) – राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
4) रेश्मा जयेश शिंदे, रा. विठ्ठलवाडी, अपक्ष – चिन्ह कपबशी.
———
*माघार 1 :-*
1) चेतना जयकुमार ढमढेरे, रा. तळेगाव ढमढेरे (शिवसेना उबाठा)
——-####——-
*[7] मांडवगण फराटा जिल्हा परिषद गट :- विभाग 20 – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)*
*शिल्लक अर्ज 4*
1) मच्छिंद्र शिवराम गदादे – (रा. तांदळी) -(शिवसेना उबाठा) – चिन्ह मशाल.
2) सुजाता अशोकराव पवार, रा. वडगाव रासाई, राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
3) सचिन बंडू शेलार – (रा. वडगाव रासाई) – भाजप – चिन्ह कमळ.
4) दादासाहेब गणपत फराटे, रा. मांडवगण, अपक्ष – चिन्ह कपबशी.
——–
*माघार 12 :-*
1) सिद्धेश्वर शिवाजी नांद्रे – (रा. इनामगाव) – अपक्ष.
2) राजेंद्र पोपटराव गदादे – (रा. तांदळी) – अपक्ष.
3) शिवाजी मुक्ताजी गदादे – (रा. तांदळी) – अपक्ष.
4) रवींद्र हिरालाल काळे – (रा. निमोणे) – अपक्ष.
5) सुखदेव बापू नारनोर – (रा. नागरगाव) – अपक्ष
6) सुधीर बाळासाहेब फराटे – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.
7) शिवाजी ज्ञानदेव कदम – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.
8) सागर महादेव फराटे – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.
9) राजीव वसंतराव फराटे – (रा. मांडवगण फराटा) – अपक्ष.
10) एकनाथ रमेश शेलार, रा. नागरगाव अपक्ष.
11) वैभव दादासाहेब कोळपे, रा. शिरसगाव, अपक्ष.
12) दादासाहेब धारू कोळपे, शिरसगाव, अपक्ष.
——###—–###—–
——###—–###—–
*पंचायत समिती*
*[1] टाकळी हाजी निर्वाचक गण – 27 – (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)*
*शिल्लक अर्ज 4*
1) सुनिता बाळकृष्ण कड – (रा. जांबुत) – भाजप – चिन्ह कमळ.
2) संगीता दामोदर दाभाडे – (रा. पिंपरखेड) – राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
3) प्रगती आशिष निचीत (रा. वडनेर खुर्द) – शिवसेना – चिन्ह धनुष्यबाण.
4) पवित्रा नवनाथ शेलार – (रा. फाकटे) – उद्धव बाळासाहेब ठाकरे – (शिवसेना) – चिन्ह मशाल.
——–
*माघार 3 :-*
1) अरुणा दामू घोडे – (रा. टाकळी हाजी) – अपक्ष.
2) रेश्मा नितीन पिंगळे – (रा. फाकटे) – अपक्ष.
3) रूपाली नवनाथ डोमे – (रा. पिंपरखेड) – अपक्ष.
#####—-####
*[2] कवठे येमाई निर्वाचक गण 28 (सर्वसाधारण महिला)*
*शिल्लक अर्ज 4*
1) माधुरी विलास थोरात – (रा. मलठण) – शिवसेना (शिंदे) – चिन्ह धनुष्यबाण.
2) शिल्पा अतुल थोरात – (रा. मलठण) – राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
3) जयश्री भाऊसाहेब लंघे – ( रा. सविंदणे) – शिवसेना (उबाठा) – चिन्ह मशाल.
4) कांचन राजेंद्र सांडभोर, रा. कवठे येमाई, भाजप – चिन्ह कमळ.
——–
*माघार 2 :-*
1) अरुणा दामू घोडे – (रा. कवठे येमाई) – अपक्ष.
2) कल्पना सुभाष पोकळे – (रा. कवठे येमाई) – अपक्ष.
#####—-####
*[3] शिरूर ग्रामीण पं. स. निर्वाचक गण – 29 – (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)*
*शिल्लक अर्ज 2*
1) स्वाती विठ्ठल घावटे, रा. रामलिंग, राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
2) उज्वला विजय भोस, रा. निमोणे, भाजप – चिन्ह कमळ.
——-
*माघार 4 :-*
1) मंगल संतोष लंघे – (रा. लंघेवाडी) – अपक्ष.
2) तृप्ती अजय सरोदे – (रा. सरदवाडी) – शिवसेना (शिंदे).
3) श्रीमती मालती बाबुराव पाचर्णे – (रा. तर्डोबाचीवाडी) – अपक्ष.
4) सुवर्णा संभाजी कर्डिले – (रा. तर्डोबाचीवाडी) – अपक्ष.
#####—-####
*[4] न्हावरा पंचायत समिती निर्वाचाक गण 30 (सर्वसाधारण)*
*शिल्लक अर्ज 2*
1) सागर बाळासाहेब खंडागळे (रा. न्हावरे) – भाजप – चिन्ह कमळ.
2) दीपक गीताराम पवार – (रा. न्हावरे) – राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
——–
*माघार 4 :-*
1) सागर आबासाहेब राजेनिंबाळकर (रा. न्हावरे) – अपक्ष.
2) ज्ञानेश्वर गेनभाऊ भैरट – (रा. गुणाट) – अपक्ष.
3) सुभाष बबन कांडगे, रा. न्हावरे,
4) महेश नारायण बेंद्रे, रा. आंबळे, अपक्ष.
####—-####
*[5] पंचायत समिती रांजणगाव गणपती निर्वाचन गण 31 – (सर्वसाधारण)*
*शिल्लक अर्ज 3*
1) सागर शिवाजी देवकर – (रा. रांजणगाव गणपती), भाजप – चिन्ह कमळ.
2) महेश निवृत्ती फंड – (रा. रांजणगाव गणपती), राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
3) संदीप शिवाजी सोनवणे – (रा. पिंपरी दुमाला), अपक्ष – चिन्ह कपबशी.
——-
*माघार 2 डमी :-*
1) भाग्यश्री महेश फंड – (रा. रांजणगाव गणपती) – अपक्ष.
2) सुनिता शिवाजी देवकर – (रा. रांजणगाव गणपती) – अपक्ष.
####—-####
*[6] पंचायत समिती कारेगाव निर्वाचन गण 32 – (सर्वसाधारण)*
*शिल्लक अर्ज 3*
1) निर्मला शुभम नवले – (रा. कारेगाव), राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
2) अक्षय रसिक नाणेकर (रा. रांजणगाव गणपती), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार – चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस.
3) मनीषा सतीश पाचंगे – (रा. ढोकसांगवी), भाजप – चिन्ह कमळ.
——-
*माघार 2 डमी :-*
1) शुभम सुरेंद्रकुमार नवले (रा. कारेगाव) – अपक्ष.
2) सतीश अंकुश पाचंगे – (रा. ढोकसांगवी) – अपक्ष.
#####—-####
*[7] पंचायत समिती पाबळ निर्वाचन गण 33 (नागरिकांचा मागास प्रवर्ग)*
*शिल्लक अर्ज 2*
1) दीपक सुरेश खैरे (रा. हिवरे), भाजप – चिन्ह कमळ.
2) वंदना प्रकाश पवार – (रा. जातेगाव बुद्रुक), राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
——-
*माघार 3 :-*
1) दिपाली दीपक खैरे – (रा.हिवरे) – अपक्ष.
2) किरण हेमंत पिंगळे – (रा. पाबळ) – अपक्ष.
3) मारुती ज्ञानेश्वर शेळके – (रा. पाबळ) – अपक्ष.
####—-####
*[8] पंचायत समिती केंदूर निर्वाचन गण – 34 (सर्वसाधारण महिला)*
*शिल्लक अर्ज 3*
1) सुचेता रोहन थिटे, रा. केंदूर, राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
2) मनीषा रघुनाथ भवार, रा. आपटी, पक्ष – बसपा, चिन्ह हत्ती.
3) आशा संपत साकोरे, रा. केंदूर, भाजप – चिन्ह कमळ.
——
*माघार 5 :-*
1) शारदा राजेंद्र ढोकले – (रा. करंदी) – अपक्ष.
2) विमल राम थिटे, केंदूर – अपक्ष.
3) गौतमी प्रवीण पऱ्हाड, केंदूर – अपक्ष.
4) दिव्या शंकर जांभळकर, रा. करंदी – अपक्ष.
5) प्रेरणा सचिन दरेकर, रा. करंदी – अपक्ष.
#####—-####
*[9] पंचायत समिती शिक्रापूर निर्वाचक गण 35 – (सर्वसाधारण)*
*शिल्लक अर्ज 2*
1) पंढरीनाथ बबन गायकवाड, रा. शिक्रापूर, भाजप – चिन्ह कमळ.
2) रामराव बबन सासवडे, रा. शिक्रापूर, राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
——
*माघार 8 :-*
1) रोहित बाळासाहेब खैरे, रा. शिक्रापूर – अपक्ष.
2) पूजा दीपक भुजबळ, रा. शिक्रापूर – अपक्ष.
3) तेजस शिवाजी राऊत, रा. शिक्रापूर – अपक्ष.
4) रमेश लक्ष्मण भुजबळ, रा. शिक्रापूर – अपक्ष.
5) संभाजी काळुराम भुजबळ, रा. कासारी – अपक्ष.
6) निलेश रंगनाथ थोरात, अपक्ष.
7) शिरीष पांडुरंग जकाते, रा. शिक्रापूर – अपक्ष.
8) त्रिनयन बापूसाहेब कळमकर, रा. शिक्रापूर – अपक्ष.
#####—-####
*[10] पंचायत समिती कोरगाव भीमा निर्वाचक गण 36 – (सर्वसाधारण महिला)*
*शिल्लक अर्ज 3*
1) मनीषा संपत गव्हाणे, रा. कोरेगाव भीमा, भाजप – चिन्ह कमळ.
2) कोमल सत्यनारायण ढेरंगे, रा. कोरेगाव भीमा, अपक्ष – चिन्ह कपाट.
3) मीना शिवाजी ढेरंगे, रा. कोरेगाव भीमा, अपक्ष – चिन्ह कपबशी.
——-
*माघार 2 :-*
1) अश्विनी युवराज दरेकर, रा. सणसवाडी – अपक्ष.
2) सुनंदा नवनाथ दरेकर, रा. सणसवाडी – अपक्ष.
####—-####
*[11] पंचायत समिती तळेगाव ढमढेरे निर्वाचक गण – 37 (सर्वसाधारण महिला)*
*शिल्लक अर्ज 3*
1) चेतना जयकुमार ढमढेरे, रा. तळेगाव ढमढेरे, शिवसेना – चिन्ह धनुष्यबाण.
2) शोभा महेश ढमढेरे, रा. तळेगाव ढमढेरे, राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
3) विद्या राजेंद्र भुजबळ, रा. तळेगाव ढमढेरे, भाजप – चिन्ह कमळ.
——-
*माघार 2 :-*
1) विद्या रमेश भुजबळ, रा. तळेगाव ढमढेरे – अपक्ष.
2) शारदा वसंत भुजबळ, रा. तळेगाव ढमढेरे – अपक्ष.
#####—-####
*[12] पंचायत समिती रांजणगाव सांडस निर्वाचक गण 38 – (सर्वसाधारण)*
*शिल्लक अर्ज 4*
1) हनुमंत बापू काळे, रा. निमगाव म्हाळुंगे, भाजप – चिन्ह कमळ.
2) राहुल राजाराम रणदिवे, रा. रांजणगाव सांडस, शिवसेना – चिन्ह धनुष्यबाण.
3) विजय सोमनाथ रणसिंग, रा. निमगाव म्हाळुंगे, राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
4) राजेंद्र बाबासाहेब पवार, रा. भांबर्डे, अपक्ष – चिन्ह अंगठी.
——
*माघार 7 :-*
1)) हनुमंत बापू काळे, रा. निमगाव म्हाळुंगे – भाजप.
2) राहुल शंकर करपे, रा. टाकळी भिमा – अपक्ष.
3) बापू बबन काळे, रा. निमगाव म्हाळुंगे – अपक्ष.
4) निलेश हरिदास रणदिवे, रा. रांजणगाव सांडस – अपक्ष.
5) नितीन कैलास रणदिवे, रा. रांजणगाव सांडस, – शिवसेना (उबाठा).
6) राजाराम दत्तात्रय जाधव, रा. दहिवडी – अपक्ष.
7) नामदेव जयवंत गिरमकर, रा. उरळगाव – अपक्ष.
#####—-####
*[13] पंचायत समिती वडगाव रासाई निर्वाचक गण 39 – (अनुसूचित जाती)*
*शिल्लक अर्ज 7*
1) माऊली पोपट पाटोळे, रा. नागरगाव, भाजप – चिन्ह कमळ.
2) पोपट महादेव शेलार, रा. नागरगाव, शिवसेना (उबाठा) – चिन्ह मशाल.
3) विकास ज्ञानदेव शेलार, रा. नागरगाव, राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
4) रणजीत दिनकर पाडळे, रा. बाभूळसर बुद्रुक, वंचित बहुजन आघाडी – चिन्ह गॅस सिलेंडर.
5) विजेंद्र सुभाष गद्रे, रा. शिरसगाव काटा, अपक्ष – चिन्ह छत्री.
6) संतोष मनोहर पटेकर, रा. जातेगाव बुद्रुक, अपक्ष – चिन्ह बॉल.
7) नानासाहेब किसनराव सोनवणे, रा. वडगाव रासाई, अपक्ष – चिन्ह एअर कंडिशनर.
——-
*माघार 3 :-*
1) अनिल चंद्रकांत कांबळे, रा. निर्वी – अपक्ष.
2) सतीश ज्ञानदेव शेंडगे, रा. नागरगाव – अपक्ष.
3) अंकुश सुभाष सोनवणे, रा. वडगाव रासाई – अपक्ष.
####—-####
*[14] मांडवगण फराटा पंचायत समिती निर्वाचक गण 40 – (सर्वसाधारण महिला).*
*शिल्लक उमेदवार अर्ज 4*
1) संगीता किशोर फराटे, रा. मांडवगण फराटा, राष्ट्रवादी – चिन्ह घड्याळ.
2) स्वाती शिवाजी मचाले, रा. इनामगाव, शिवसेना (उबाठा) – चिन्ह मशाल.
3) शोभा नाना वराळे, रा. मांडवगण फराटा, भाजप – चिन्ह कमळ.
4) दिपाली महेंद्र नागवडे, रा. मांडवगण फराटा, अपक्ष – चिन्ह छत्री.
——
*माघार 9 :-*
1) पल्लवी संजय घाडगे, रा. इनामगाव – अपक्ष.
2) अनुराधा प्रफुल्ल घाडगे, रा. इनामगाव – अपक्ष.
3) पूजा सचिन मचाले, रा. बाभूळसर – अपक्ष.
4) वैजयंता महेश घाडगे, रा. इनामगाव – अपक्ष.
5) शामल रामदास जगताप, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
6) स्वाती सुधीर फराटे, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
7) पूजा प्रशांत माने, रा. बाभूळसर बुद्रुक – अपक्ष.
8) लतिका आनंदराव वराळे, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
9) प्रतीक्षा प्रवीण जगताप, रा. मांडवगण फराटा – अपक्ष.
####THE END ####
(टीप व आवाहन : आदर्श आचार संहितेनुसार निवडणूक प्रचाराची अंतिम तारीख व वेळ : गुरुवार दि. 05/02/2026 रोजी रात्री 10.00 पर्यंत).