ब्रेकिंग
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व मा. जीप सदस्या शोभनाताई पाचंगे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन
जिल्हा बँकेच्या संचालिका, जीप सदस्या व महिला दक्षता समितीवर केले होते काम

0
0
8
2
3
4
शिरूर
*दक्षता समिती शिरूर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका, माजी जीप सदस्या शोभना रावसाहेब पाचंगे यांचे १५ ऑगस्ट रोजी दुःखद निधन*
——–
बातमी : रविंद्र खुडे, संपादक, खुडेज टूडेज न्यूज, शिरूर 9422650735..
——–
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे ढोकसांगवी गाव. या गावातील पाचंगे हे एक शेतकरी कुटुंब. या कुटुंबातील रावसाहेब पाचंगे यांचे लग्न, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका छोट्या खेडेगावातील देशमुख कुटुंबियांची लेक शोभना यांच्याशी झाले. शोभनाताईच्या वडिलांनी रावसाहेब पाचंगे आणि कुटुंबियांना अट घातली, की आमच्या मुलीला शिक्षणाची खूप आवड असून, आमच्या मुलीला लग्नानंतरही शिकायची इच्छा आहे. ही अट मान्य केल्यावर शोभनाताई व रावसाहेब पाटील पाचंगे यांचा विवाह धूमधडाक्यात झाला. लग्नानंतर शोभना ताईंनी एम ए पर्यंत शिक्षण घेतले. देशमुख व पाचंगे परिवाराला राजयोग असल्याने, राजकारणात शोभना ताईंना मोठी संधी मिळाली. ई. स. ८० ते ९० च्या दाहकात महिला या राजकारणात फार कमी असायच्या. मात्र पती व सासर – माहेर कडच्या मंडळींचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने शोभना ताईंना जिल्हा बँक (पुणे), जिल्हा परिषद सदस्या होण्याची सुवर्ण संधी मिळाली.
पुढे रावसाहेब पाटलांचे निधन झाल्यावरही शोभना ताईंनी दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. आज त्यांचा एक मुलगा जर्मनीला स्थित असून दुसरा मुलगा वकील व व्यावसायिक ही आहे. शिरूर शहरातील हुडको कॉलनीत या सर्व आठवणी असल्याने, त्यांनी याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे ठरवून, हे घर शोभना ताईंनी शेवटपर्यंत सोडले नाही. आणि याच घरात १५ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी संध्याकाळी या जगाचा शेवटचा निरोप घेतला.
या आधीही त्यांना हृदय विकाराचा धक्का बसला होता, मात्र माझ्या दोन्ही मुलांनी माझी खूप काळजी घेतल्याने माझे प्राण वाचले असे नेहमी त्या आमच्याशी बोलताना सांगायच्या.
त्या शिरूर पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता समितीवर काम करत असल्याने, त्यांचा ७५ वयातही खूप मोठा जनसंपर्क होता. शिरूर पोलीस स्टेशन येथे येणाऱ्या पीडित महिलांसाठी त्या आई बनल्या होत्या. ग्रह विभागाचे समुपदेशन केंद्र जरी पोलीस स्टेशन आवारात होते, तरी देखील शोभनाताई पाचंगे यांच्या महिला दक्षता समितीच्या एका अडगळीच्या ठिकाणी मांडलेल्या टेबल व खुर्च्या या बसण्यासाठी सर्वांच्या हक्काच्या असल्याचे चित्र होते. माझ्यासह काही पत्रकार मंडळी, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्या, पोलीस स्टेशनला येणारे जाणारे सर्वजण शोभना ताईंशी बोलल्या शिवाय जात नसत. त्यांना पोलीस स्टेशनला इतका विरंगुळा वाटायचा, की येथे आल्यावर त्यांना ऊर्जा आल्याचे पाहायला मिळायचे. त्यांच्या मुलांनी त्यांना अनेकदा वयामुळे आराम करण्याचा सल्ला दिला अशा त्या सांगायच्या. मात्र आयुष्यभर समाजासाठी काम करण्यासाठी सतत समाजात राहिल्याने, त्यांना घरी चैन पडणारी नसल्याने दररोज सकाळी ९-१० वा. त्या शिरूर पोलीस स्टेशनला रिक्षाने यायच्या. आणि दुपारी पुन्हा रिक्षाने घरी जायच्या. आपली दोन्ही मुले, सुना व नातवंडांचे त्या कौतुक करत असतानाच, माझ्यासह अनेकांना त्यांनी आईचे प्रेम दिले. येणाऱ्या महिलांनाही मुलीसारखे प्रेम दिले. आपल्या नातीचे लग्न खूप थाटामाटात झाल्याचे फोटो त्या नेहमी आम्हाला दाखवत.
अशा आमच्या सर्वांच्या प्रेमळ मम्मीने देशाच्या ८० व्या स्वातंत्र्याच्या दिवशीच आपले प्राण सोडल्याने, सर्वांनाच खूप मोठा मानसिक धक्का बसला. त्यांच्या निधनाची बातमी अंनिस च्या डॉ वैशाली साखरे, आधार छाया फौंडेशनच्या सविता बोरुडे व प्रीती बनसोडे यांनी ज्या वेळी मला रात्री ८ वाजता फोनवरून सांगितली, त्यावेळी माझ्यासह ऐकणाऱ्या अनेकांना यावर विश्वास बसला नाही. कारण सकाळीच ध्वजारोहन कार्यक्रमावेळी त्या सर्वांशी चांगल्या बोलल्या व माझा हा इथला शेवटचा ध्वजरोहन आहे असे म्हणाल्याने सर्वचजण आच्छर्यचकीत झाले होते. आणि खरंच त्यांचा शेवटचा दिवस १५ ऑगस्ट रोजीच असेल असे कुणालाच वाटले नव्हते.
अशा प्रेमळ माऊलीस भावपूर्ण श्रद्धांजली.
शब्दांकन : रवींद्र खुडे, शिरूर
0
0
8
2
3
4