
*शिरूर कृऊबास 2026-31 साठी 18 जागेसाठी 52 उमेदवार रिंगणात*
——-
शिरूर : दि. 22/06/2026.
बातमी : रवींद्र खुडे, संपादक, खुडेज टूडेज न्यूज.
——-
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2026-31 करिता एकूण 266 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 22 जून 2026 रोजी, तब्बल 214 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 18 जागेसाठी 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरल्याची माहिती, शिरूर कृ.ऊ.बा. समिती निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.
शिरूर कृ.उ.बा. समिती निवडणूक गटनिहाय उमेदवार :-
[१] *सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गट :-*
1) संतोष फक्कडराव शिंदे.
2) शिवाजी सुखदेव वडघुले.
3) हनुमंत बाजीराव शिवले.
4) राजेंद्र रंगनाथ गायकवाड.
5) विश्वास रामकृष्ण ढमढेरे.
6) संदिप दत्तात्रय गायकवाड.
7) ज्ञानेश्वर बबनराव थेऊरकर.
8) नानाभाऊ नामदेव फुलसुंदर.
9) राहुल संभाजी गवारी.
10) बापूसाहेब कांतीलाल शिंदे.
11) शशिकांत पांडुरंग दसगुडे.
12) संभाजी शिवाजी फराटे.
13) संजय शिवाजी पाचंगे.
14) प्रमोद बाळासाहेब पऱ्हाड.
15) रामचंद्र नारायणराव नागवडे.
16) विजय किसनराव ढमढेरे.
17) स्वप्निल अरूणराव गायकवाड.
18) उध्दव माणिकराव शेलार.
19) संतोष बाळासाहेब भोसले.
——–
[२] *सेवा सहकारी संस्था महिला राखीव गट :-*
1) सुजाता राजेंद्र नरवडे.
2) उज्वला अनिल शेलार.
3) प्रतिभा बाळासाहेब नागवडे.
4) शशिकला नानाभाऊ फुलसुंदर.
5) राजश्री रविंद्र फराटे.
——–
[३] *सेवा सहकारी संस्था इतर मागास वर्गीय (OBC) गट :-*
1) संभाजी बाजीराव कर्डिले.
2) विकास काशिनाथ शिवले.
3) राजेश दत्तू लांडे.
——-
[४] *सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती/भटक्या जमाती (VJNT) गट :-*
1) गोरखनाथ बाबुराव तांबे.
2) सतिश भागूजी कोळपे.
3) सुहास पंढरीनाथ मलगुंडे.
4) गंगाराम गेणू शिंदे.
———
[५] *ग्रामपंचायत सर्वसाधारण गट :-*
1) संतोष बबनराव मोरे.
2) सागर खासेराव दंडवते.
3) नानासाहेब साबळे.
4) केशव अनिल शिंदे.
——-
[६] *ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) गट :-*
1) महादेव सिताराम जाधव.
2) राजेंद्र किसन गायकवाड.
3) नितीन महादेव पाटोळे.
4) बाळासाहेब दादाभाऊ जाधव.
5) वैष्णव आनंदा इसवे.
——–
[७] *ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) गट :-*
1) संभाजी बाजीराव कर्डिले.
2) नामदेव महादेव जाधव.
3) संतोष काशिनाथ दौंडकर.
——–
[८] *व्यापारी आडते गट :-*
1) अॅड. सुदीप सतीष गुंदेचा.
2) सुनिल कांतीलाल बाफना.
3) मयुर भाऊलाल ओस्तवाल.
4) नारायण गबाजी भोसले.
——–
[९] *हमाल – मापाडी गट :-*
1) संदिप विठ्ठल दसगुडे.
2) बाळासाहेब नानासाहेब कर्डीले.
3) निलेश सुरेश दसगुडे.
4) बंडू खंडू जाधव.
5) मुक्ता खंडू गुलदगड.
———××××——–
अशा एकूण 52 जणांचे अर्ज शिल्लक राहिल्याने ते निवडणूक रिंगणात राहिले असून, आजी आमदार व माजी आमदार यांचे विरोधी पॅनल झाल्याचे चित्र आहे. मात्र अद्याप माजी आमदार अशोक बापू पवार यांनी उघड प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली नसल्याने त्यांची भूमिका सध्यातरी अस्पष्ट दिसत आहे.
मात्र त्यांनी निवडणूक प्रक्रियेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केल्याने, 29 जूनला काय निकाल लागतोय यावरच त्यांचे पुढील पाऊल काय असेल ते उघड होऊ शकते.
शिरूर कृऊबास निवडणुकीत अनेक (बहुतांशी) ग्राम पंचायतीतील मतदार हे मतदान प्रक्रियेपासून वंचित राहणार आहेत, कारण सध्या त्या ग्राम पंचायतींचा कालखंड संपल्याने त्यावर प्रशासक आहेत.
एका बाजूने जरी माजी आमदार अशोक बापू पवार यांचा हा दावा खरा असला आणि त्यासाठी त्यांनी मुंबई हाय कोर्टात अपील केले असले, तरी देखील त्या प्रशासकीय ग्राम पंचायतींच्या हद्दीतील पुढाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कुठलाही अन्याय या ग्राम पंचायतींवर होणार नसल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत.
त्यामुळे आता न्यायालय नेमका काय निर्णय देतेय यावरच पुढील राजकीय घडामोडी घडणार आहेत.
मात्र येथून मागील राजकीय निवडणूकांच्या अनुभवांनुसार, न्यायालयातील निकाल चालू राहतात आणि तोपर्यंत निवडणुका होऊन गेलेल्या असतात. त्यामुळे शासनाने राबविलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल असे यावरून म्हणणे योग्य राहील.
त्यामुळेच माघार प्रक्रिया होण्याआधीच व निवडणूक चिन्हे मिळण्या आधीच, काही उत्साही उमेदवारांनी आपली भोंगी लावून जाहीर प्रचार सुरुही केला होता.
———
या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघासाठी 11 जागा असून त्यासाठी पात्र मतदान 1589 मतदान आहे. ग्रामपंचायत मतदार संघासाठी 4 जागा असून त्यासाठी 206 मतदान आहे. व्यापारी-आडते मतदार संघासाठी 2 जागा असून त्यासाठी 464 मतदान आहे. तर हमाल-मापाडी मतदार संघासाठी 1 जागा असून त्यासाठी 137 मतदान आहे.
- अशा एकूण 18 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी एकूण मतदार 2396 इतके असणार आहेत. त्यामुळे आता या मतदारांना त्या त्या गटातील उमेदवार काय काय आमीशे दाखवतील हे सांगता येणार नाही.
मात्र तरीही लोकशाही पद्धतीने मतदान होईल यात शंकाच नसून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक निर्णय आशिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे.
- मतदान 5 जुलै 2026 रोजी सकाळी शिरूर येथे 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल (नंतर सांगण्यात येणाऱ्या ठिकाणी).
तर मत मोजणी त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता सुरु होऊन (नंतर सांगण्यात येणाऱ्या ठिकाणी), निकाल लगेचच त्याच दिवशी जाहीर होणार आहे.



