संपादकीय

मनस्विनी महिला उन्नती संस्थेकडून शिरूर पोलीस स्टेशनला रक्षाबंधन साजरे

अध्यक्षा वैशाली अनिल गायकवाड व महिला होत्या उपस्थित

0 0 8 2 3 4

*मनस्विनी महिला उन्नती संस्थेकडून शिरूर पोलीस स्टेशनला रक्षाबंधन साजरे*
——-
बातमी : रविंद्र खुडे, संपादक, खुडेज टूडेज न्यूज 9422650735..
——-
शिरूर येथील मनस्विनी महिला उन्नती संस्थेकडून विविध उपक्रम साजरे होतात. त्या अनुषंगाने दरवर्षी शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या जातात. पोलीस बांधव हे कर्तव्यवार असल्यामुळे व आपल्या कुटुंबियांसोबत रक्षाबंधन सण साजरा करू शकत नसल्याने, ती कमतरता थोडीफार का होईना भरून निघत असल्याने, पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो, असे मत या संस्थेच्या अध्यक्षा वैशाली अनिल गायकवाड यांनी यावेळी बोलून दाखविले.

     या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी मनस्विनी महिला उन्नती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली गायकवाड, निर्मला ढोकले, सुजाता मातेकर, संजना लोंढे, मोनिका राठोड, पूजा काळे, पूजा काबे, जयश्री वीर, सुनिता डोंगरे, सुनंदा गोसावी, अर्चना माळी, मनीषा शितोळे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.
या रक्षाबंधन कार्यक्रमावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर व दिवटे, पोलीस ऊप निरीक्षक दिलीप पवार व राकेश मुळे तसेच बहुसंख्येने महिला व पुरुष अंमलदार
उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे