ब्रेकिंग

मा. सरपंच संभाजी (राजे) कर्डीले यांचा सौ स्वाती विठ्ठल घावटे यांच्या राष्ट्रवादीच्या पं स उमेदवारीला पाठिंबा

शिरूर ग्रामीण व पंचक्रोशीतील राजकारणाला कलाटणी

0 0 2 9 7 7

मा सरपंच संभाजी कर्डीले यांचा सौ स्वाती विठ्ठल घावटे यांना पं. स. साठी पाठिंबा*
—————–
शिरूर : दि. 21/01/2026.
———-
सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. या आधी नगरपालिका व महानगरपालिका निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. मात्र जशी राज्याच्या सत्तास्थापनेवेळी उलथापालथ झालेली होती व ज्याला जेथे सोयीस्कर असेल त्या त्या पक्षात काहीजण मनाने तर काहीजण मनाविरुद्ध गेलेले होते. तशीच उलथा पालथ आजही प्रत्येक निवडणुकीत चालू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकारण दररोज नवनवे वळण घेताना दिसत आहे.
आता जी. प. व पं. स. निवडणुका लागलेल्या असून, अनेकजण वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत किंवा राजकीय घडामोडिंमुळे तसे त्यांना करावे लागत आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी काँगेस या निवडणुकीत एकत्र आलेले असल्याने, आता प्रत्येक जीप गटातील व गणातील कुणातरी इच्छुक उमेदवाराला आपोआप गप्पच बसावे लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या शिरूर ग्रामीण ग्राम पंचायतचे माजी लोकनियुक्त सरपंच विठ्ठल गणपत घावटे, हे या भागातील पंचायत समिती गणामध्ये उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र ही जागा आरक्षण सोडतीत महिलेसाठी राखीव निघाल्याने विठ्ठल घावटे यांच्या पत्नी व शिरूर ग्रामीण ग्राम पंचायतच्या माजी सरपंच सौ स्वाती विठ्ठल घावटे यांचा प्रचार त्यांनी खुप दिवसांपासून आधीच सुरु केलेला होता. मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे मात्र त्यांचे निश्चित नव्हते. परंतु उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी त्यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घड्याळ चिन्हाची उमेदवारी जाहीर केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही उमेदवारी बसविण्याचे काम शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व शिरूर ग्रामीण ग्रुप सोसायटीचे माजी चेअरमन शशिकांत पांडुरंग दसगुडे यांच्या आग्रहास्तव, विठ्ठल घावटे यांचे चुलते व माजी आदर्श सरपंच अरुण घावटे यांनी केलेय. मात्र घावटे कुटुंब हे अनेक वर्षांपासून भाजप चे दिवंगत माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या विचारांशी एकनिष्ठ होते. मात्र मागील काही दिवसांच्या घडामोडिंमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते शशिकांत दसगुडे यांच्या संपर्कात होते.
सौ स्वाती विठ्ठल घावटे यांची राष्ट्रवादीने उमेदवारी घोषित केल्याने आता शिरूरला लागून असणाऱ्या शिरुर ग्रामीण व पंचक्रोशीतील पंचायत समिती गणातील अनेक आजी माजी सरपंच व पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
घावटे यांची उमेदवारी राष्ट्रवादीने घोषित केल्यामुळे तर्डोबाच्यावाडीचे माजी सरपंच पै. संभाजी (राजे) कर्डीले यांनी घावटे यांना जाहीर पाठिंबा दर्शवीला आहे.
मा. सरपंच संभाजी (राजे) कर्डीले हे पूर्वी स्व. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे अगदी जवळचे समर्थक होते. मात्र त्यांच्या गावच्या राजकारणात ते त्यावेळी दुखावल्याने त्यांनी मा. आमदार अशोक पवार यांना साथ देणे पसंत केले. त्यानंतर पाचर्णे आणि कर्डीले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले व ते आजतागायत तसेच राहिले. याचे कारण त्यांना एकत्र आणण्यासाठी कोणत्याच नेत्याने प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे सद्य परिस्थितीत कर्डीले हे सुद्धा त्यांच्या पत्नी सौ सुवर्णा संभाजी कर्डीले यांच्या पं स उमेदवारीसाठी इच्छुक असूनही, राष्ट्रवादीने घावटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने, कर्डीले यांनी घावटे यांच्यासाठी व पंचक्रोशीतील गावकारभारी व वरीष्ठानच्या मध्यस्थीमुळे, ही निवडणूक न लढविता राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती घावटे यांना जाहीर पाठिंबा देण्याचे ठरविल्याचे त्यांनी “खुडे’ज टुडे’ज न्यूज नेटवर्कचे” संपादक रवींद्र खुडे यांच्याशी प्रत्यक्ष बोलताना, मंगळवार दि. 20/01/2026 रोजी रात्री 8 वा. हॉटेल विसावा येथे सांगितले. त्यांनी बोलताना सांगितले की, “मी हा निर्णय घेण्याचे कारण असे आहे की, शिरूर व पंचक्रोशीत एकजूट रहावी, नाती गोती व मैत्रीपूर्ण संबंध रहावेत आणि एकमेकांच्या साथीमुळे विकासकामे अधिक होतील, या आशेने मी आमच्या घरातील उमेदवारी मागे घेत, घावटे यांना जाहीर पाठिंबा देत आहे.”
मा. सरपंच संभाजी कर्डीले यांनी घेतलेल्या भूमिकेसारखाच निर्णय जर शिरूर पंचक्रोशीतील अनेकांनी घेतला तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ही निवडणूक अगदी सहज होणार आहे.
घावटे कुटुंबियांबाबत लोकांमध्ये सहानुभूती असून, त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने आता भाजप सह इतर पक्षांचीही खुप मोठी गोची निर्माण होण्याची चिन्हे शिरूर ग्रामीण व पंचक्रोशीत दिसत आहे.
मात्र तरडोबाच्यावाडीचे मा. सरपंच तथा शिरूर ग्रामीण ग्रुप सोसायटीचे विद्यमान संचालक संभाजी (राजे) कर्डीले यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पं.स. च्या उमेदवार स्वाती घावटे यांना दिलेल्या पाठिंब्याच्या निर्णयामुळे या गणात काय काय घडामोडी घडतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 9 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे