ब्रेकिंग

ड्रग्स प्रकरणात चक्क पोलिसाचा समावेश : आणखी 9 किलो ड्रग्स हस्तगत : आत्तापर्यंत 20 कोटींचे ड्रग्स व तिघेजण ताब्यात

खाकी वर्दी ड्रग्स तस्करीत : राज्यात एकच खळबळ

0 0 2 9 7 7

*ड्रग्स तस्करीत चक्क पोलीस : आणखी 9 किलो ड्रग्स हस्तगत : एकच खळबळ*
——–
शिरूर/पुणे : दि. 21/01/2026.
———-
पुणे ग्रामीण पोलिसांनी आत्तापर्यंतची अंमली पदार्थ विरोधी सर्वात मोठी कारवाई करत, तब्बल 10 किलो मेफेड्रोन (MD) ड्रग्स पकडण्यात यश मिवलंय.
दोन दिवसांपूर्वीच पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर शहरालगत असणाऱ्या बाबुरावनगर परिसरात एक किलो MD ड्रग्स बाळगणाऱ्या एका तरुणास पकडले होते. या प्रकरणाचा पुढील तपास करत असताना पुणे ग्रामीण पोलिसांना मोठ यश आलं असून, पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यात मंगळवार दि. 20/01/2026 रोजी फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, LCB, DB सह अनेक पोलीस पथके तयार करून त्यांना पुढील तपासासाठी पाचारण केलेले होते. त्यांनी मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटेच्या दरम्यान आणखी नऊ किलो MD ड्रग्स पकडलंय. त्यामुळे पोलिसांनी आत्तापर्यंत तब्बल 10 किलो MD ड्रग्स पकडलेले आहे. याची बाजारभावातील किंमत तब्बल 20 कोटी रूपये असून, धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांचा एक पोलीस कर्मचारीच सहभागी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, यात पोलिसच सहभागी असल्याने, त्या एकामुळे खाकी वर्दीला मोठा डाग लागला असून, त्यामुळे राज्यात आता एकच खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.
या घटनेनंतर आता अजुन काय काय घडामोडी घडतील? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 9 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे