राज्य माता गो माता संवाद यात्रेचा शिरूरला मुक्काम
गो वंश वाढ, संगोपन, फायदे ई चे मार्गदर्शन

शिरूर नगरीत ‘राज्य माता गोमाता संवाद यात्रा’ चे उत्साहात स्वागत
——–
शिरूर : दि. 23/06/2026.
बातमी : रवींद्र खुडे, संपादक
——–महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या, ‘राज्य माता गोमाता संवाद यात्रे’ चे शिरूर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ही यात्रा महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखरजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात मार्गक्रमण करत आहे. शिरूर येथील स्वागत सोहळ्याप्रसंगी गोवंश संगोपन, संवर्धन आणि गोसेवा आयोगाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून यात्रेचे स्वागत केले आणि संवाद यात्रेच्या उद्देशाला पाठिंबा दर्शवला. या स्वागत सोहळ्याला ‘राज्य माता गोमाता संवाद यात्रा’ पुणे जिल्हा समन्वयक प्रतिक बनकर, शिरूर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. वसंत गारुडकर, पारनेरचे नायब तहसीलदार दीपक कारखिले, तसेच शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक उमेश शेळके, दीपक निकम, नितीन भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
ही यात्रा शिरूर येथे मुक्काम करून अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झाली.
