संपादकीय

शिरूर वाहतूक पोलिसांनी गणपती उत्सवादरम्यान चांगली कामगिरी केल्याने शिवबा संघटनेच्या वतीने सन्मान

सन्मानार्थ शिरूर पोलीस स्टेशनला दिल्या ५१ काठ्या

0 0 8 2 3 4

वाहतूक पोलिसांच्या कर्तव्याला सलाम : शिवबा संघटनेतर्फे ५१ ‘कर्तव्याच्या काठ्या’ भेट.

गणेश विसर्जन निर्विघ्न पार पाडत अहोरात्र रस्त्यावर उभ्या राहिलेल्या पोलिसांचा संघटनेने केला सन्मान : पोलीस-जनतेतील विश्वासाचा सेतू मजबूत करण्यासाठी स्तुत्य उपक्रम.

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत, संपूर्ण गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांसाठी वाहतूक सुरळीत ठेवत, गर्दीचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस बांधवांच्या कार्याला सलाम म्हणून शिवबा संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पोलीस बांधवांना ५१ काठ्या भेट देण्यात आल्या. या काठ्या केवळ भेटवस्तू नसून कायदा-सुव्यवस्था, वाहतूक शिस्त आणि नागरिकांचे संरक्षण यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलिसांच्या कर्तव्याचे प्रतीक म्हणून देण्यात आल्या असून, या उपक्रमातून जनसेवा करणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता आम्ही व्यक्त केलीय.

यावेळी पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम आणि पोलीस अंमलदार सचिन गोरे यांच्यासह इतर पोलीस बांधवांना कर्तव्याच्या काठ्या देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

गणेश विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, मिरवणुका आणि वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. नागरिक उत्सवाचा आनंद घेत असताना वाहतूक पोलीस मात्र रस्त्यावर उभे राहून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असतात.

‘काठी’ म्हणजे शिस्त, संरक्षण आणि कर्तव्याचे प्रतीक :-

पोलिसांच्या हातातील काठी ही केवळ नियंत्रणाचे साधन नसून कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांचे संरक्षण यांच्यामधील प्रतीकात्मक दुवा आहे. त्यामुळे ५१ काठ्या भेट देऊन वाहतूक पोलिसांच्या कर्तव्याला दिलेली सलामी त्यांच्या जनसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आहे.

या उपक्रमाचा प्रमुख उद्देश पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील सलोखा वाढविणे, परस्पर संवादाला चालना देणे आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे हा आहे. पोलीस हे समाजाच्या सुरक्षिततेचे रक्षक असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या कार्याबद्दलही शिवबा संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. गणेशोत्सव व विसर्जन काळात पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन, बंदोबस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतलेली मेहनत याबद्दल संघटनेने पोलीस प्रशासनाचे कौतुक केले.

“उत्सवाचा आनंद नागरिकांनी घेतला; मात्र हा आनंद सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहावा यासाठी रस्त्यावर उभे राहून वाहतूक पोलिसांनी आपले कर्तव्य निभावले. त्यांच्या या कर्तव्याला ५१ काठ्यांच्या माध्यमातून आमची मानाची सलामी आहे. पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट व्हावे, हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.”

(शब्दांकन : माऊली घोडे, टाकळी हाजी)

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे