आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा 2026-27 कार्यकारिणी पदग्रहण समारोह संपन्न
डॉक्टरांनी मजबूत संघटन करणे ही काळाची गरज आहे : डॉ. स्वप्नील चौधरी (कवी)

*आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पदग्रहण समारंभ संपन्न : डॉ प्रतीक गायकवाड.*
———-
“डॉक्टरांनी मजबूत संघटन करणे ही काळाची गरज आहे : डॉ. स्वप्नील चौधरी”
———-
बातमी : रवींद्र खुडे
शिरूर / पुणे : दि. 26/04/2026.
———
आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन 2026-27 च्या वर्किंग कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा, नुकताच मंचर या ठिकाणी संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी डॉ. स्वप्नील छाया विलास चौधरी यांनी डॉक्टरांनी मजबूत संघटन करने ही काळाची गरज आहे असे उदगार काढले.
मंचर येथील माऊली हॉटेल एकलहरे येथे हा पदग्रहण समारंभ उत्साहत आणि दिमाखात पार पडला. या वर्किंग कार्यकारणीच्या अध्यक्ष पदी मंचर येथील डॉ. प्रतीक पांडुरंग गायकवाड यांनी पदभार स्वीकारला. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुनिल खिंवसरा यांच्या हस्ते अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व कवी डॉ. स्वप्नील चौधरी यांनी आपल्या भाषणात निसर्ग आणि इतर कविता सादर करून कार्यक्रम एका उंचीवर नेला. आपल्या भाषणात ते म्हणाले की याप्रसंगी खेड, आंबेगाव, जुन्नर, मंचर, चाकण इ तालुक्यातील सर्व डॉक्टर आणि डॉक्टरांचे पदाधिकारी एकत्र येतात ही कौतुकास्पद बाब आहे.
याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल मा. प्राचार्य डॉ. पांडुरंग निवृत्ती गायकवाड व वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल योगदान दिल्याबद्दल डॉ. नरेंद्र लोहाकरे या दोघांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवीण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव कथे हे होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टरांनी संघटन करण्याबरोबर माणुसकी आणि मानवता मूल्ये जपली पाहिजेत असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. सदानंद राऊत, डॉ. अमोल बेनके, जुन्नर तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रशांत काचाळे, खेड तालुक्यातील डॉ. पौर्णिमा कहाणे, मोशी असोसिएशनचे डॉ. पवन वैरागर, ई. नी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. सुहास कहडणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अश्विनी रुपेश भोर यांनी करून दिला. नवनिर्वाचित कमिटीची नावे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रतीक गायकवाड यांनी जाहीर करून येत्या नवीन वर्ष्यामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन सर्व प्रकारचे उपक्रम घेऊन संघटना मजबूत करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नुतन कार्यकारिणी : अध्यक्ष डॉ. प्रतीक पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. पूनम पुरुषोत्तम दहितूले, सचिव डॉ. क्षितिज काकडे, सहसचिव डॉ. राजश्री रंगनाथ कोल्हे, खजिनदार डॉ. अश्विनी रुपेश भोर, सहखजिनदार डॉ. अमित रोहिदास भोर. तसेच सर्व वरिष्ठ डॉक्टर्स हे सल्लागार म्हणून निवड करण्यात आले आहेत.
या प्रसंगी डॉ. सुनिल शेवाळे, डॉ. प्रदीप शेवाळे, डॉ. कैलास धायबर, डॉ. चंद्रकांत पोखरकर, डॉ. सुदाम खिलारी, डॉ. रसिक काळे, डॉ. किरण लोखंडे, डॉ. अरुण मांढरे, डॉ. आशिष चव्हाण, डॉ. नितीन गाडे, डॉ. शेटे, डॉ. गुजराथी ई. डॉक्टर्स उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. दत्ता चासकर, डॉ. सुहास कहडणे, डॉ. संतोष बबनराव शिंदे, डॉ. समीर रोडे, डॉ. अश्विनी भोर, डॉ. दीपाली मांढरे, डॉ. राजश्री कोल्हे, डॉ. ऋतुजा घोलप यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वायाळ व कु. पडवळ यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. पूनम दहितूले यांनी मानले.
