आरोग्य व शिक्षण

पत्रकार अर्जुन बढे यांचा मुलगा प्रणव ला 10 वी बोर्ड परीक्षेत 97.40% गुण

प्रणवच्या यशामुळे आमच्या कुटुंबियांचा आणखी सन्मान वाढला : बढे कुटुंबीय

0 0 4 5 3 3

पत्रकार अर्जुन बढे यांचा मुलगा प्रणव ला दहावी बोर्ड परीक्षेत 97.40% गुण
———
शिरूर : दि. 09/05/2026.
बातमी : रविंद्र खुडे, संपादक.
———

शिरूर येथील पत्रकार व पारनेर तालुक्यातील जातेगाव येथिल श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अर्जुन बढे, यांचा मुलगा प्रणव अर्जुन बढे याने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये तब्बल 97.40 % गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या उज्वल यशामुळे शिरूर शहरासह परिसरात त्याचे कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अत्यंत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर प्रणवने हे यश मिळवले असून, अभ्यासासोबतच वेळेचे योग्य नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा, तसेच विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे, वर्गशिक्षिका मंगल भालेकर तसेच क्लासचे प्रसाद कवाष्टे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रणवने अभ्यासाची योग्य दिशा ठरवत सातत्याने मेहनत घेत उत्कृष्ट यश संपादन केल्याचे प्रणव व त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
प्रणवच्या या यशाबद्दल शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके, पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस सिताराम लांडगे, शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती विठ्ठल घावटे, शिरूर नगरपालिका बांधकाम समितीचे सभापती सुनिल जाधव तसेच शिरूर तालुक्यातील पत्रकार मित्र, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रणवचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आमचा मुलगा प्रणव याच्या या यशामुळे आमच्या कुटुंबीयांचा सन्मान वृद्धिंगत झाला असून, शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे मत पत्रकार अर्जुन बढे यांनी व्यक्त केले.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 5 3 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे