शिरूर नगरीत माँसाहेब जिजाऊ अभिवादन रथयात्रेचे जल्लोषात स्वागत
समस्त शिरूरकरांनी माँसाहेब जिजाऊंच्या रथ व प्रतिमेचे घेतले दर्शन

*शिरूर नगरीत ‘माँसाहेब जिजाऊ अभिवादन रथ यात्रेचे जल्लोषात स्वागत*
——–
शिरूर (पुणे)
जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेड राजा ते समाधीस्थळ पाचाड (रायगड) या मार्गावर निघालेल्या “माँसाहेब जिजाऊ अभिवादन रथ यात्रेचे” आज मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता, शिरूर नगरीमध्ये उत्साहात आगमन झाले. येथील नगर पुणे हाय वे वर असणाऱ्या ज्युडिओ मॉल परिसरात जमलेल्या शेकडो जिजाऊ प्रेमींनी, या रथ यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रथावरील माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन व नमन करण्यात आले.
या अभिवादन सोहळ्यास शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष्या ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, पंचायत समितीच्या सभापती स्वाती विठ्ठल घावटे, नगरसेविका संगीता महेंद्र मल्लाव, नगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम समिती सभापती आयेशा कलीम सय्यद, पाणीपुरवठा विभाग सभापती डॉ. सुनिता संतोष पोटे, नियोजन विकास व ग्रहनिर्माण सभापती स्वाती चेतन साठे, मा. सरपंच जिजाताई दुर्गे, कोहकडीच्या विद्यमान सरपंच सीमा अरुण पवार, नगरसेवक उमेश शेळके, कारेगाव
ग्रामपंचायत सदस्य तुषार कोहकडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धनक, उद्योजक डॉ. राजेराम प्रभू घावटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शिरूर अध्यक्ष शामकांत वर्पे, अतुल पाठकजी यांच्याशिवाय अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून माँसाहेबांच्या कार्याचे स्मरण करत अभिवादन केले. रथ यात्रेचे भव्य नियोजन आणि सुयोग्य स्वागतासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्यांचे यावेळी कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यात आले. या नियोजनात गणेश गव्हाड, प्राध्यापक हाडके, सौ हाडके, श्रीमंदिलकर, विशाल कारखिले, राहुल भागवत, प्रा सतीश धुमाळ, राणी कर्डिले, शितल शर्मा, कीर्ती गव्हाड, सारिका नागवडे, हाडवळे ताई, अनघा पाठकजी, सुवर्णा चिपाडे, डॉ वैशाली साखरे, श्रीमती जाधव यांनी मोलाचे योगदान दिले.
संध्या गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्यरित्या पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक श्रीमंत शिवाजीराजे जाधव यांनी, शिरूरकरांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक व माता भगिनी आणि युवकांची मोठी उपस्थिती होती.
शब्दांकन :
निंबा मराठे, प्रसिद्धी प्रमुख (धुळे) 🚩🚩🚩