आरोग्य व शिक्षण

मातंग समाजातील गरीब कुटुंबातील विकास अवचिते यांनी MPSC द्वारे STI पदी घातली गवसणी

अवचिते हे सर्वसामान्य मातंग कुटुंबातील होतकरु अभ्यासू तरुण

0 0 8 2 3 4

*मातंग समाजाच्या विकास अवचितेंची MPSC मधून STI पदाला गवसणी*
——–
बातमी : रविंद्र खुडे, संपादक 9422650735..
दि. 20/08/2026.
——–
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे आलेगाव पागा येथील एका गरीब मातंग कुटुंबातील विद्यार्थ्याने, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या STI परीक्षेत बाजी मारत सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विकास अवचिते यांची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून, त्यांचे आई व वडील हे दोघेही मोल मजुरी करतात. तर एक भाऊ नोकरीला आहे. विकास सोपान अवचिते यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्याच आलेगाव पागा या गावातील जीप च्या मराठी शाळेत झाले असून, त्यानंतरचे ई. १० वी पर्यंतचे शिक्षण भैरवनाथ विद्यालय, आलेगाव पागा व ई. ११ व १२ वी चे शिक्षण श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे येथे झाले आहे. त्यानंतर पदवी चे शिक्षण पुणे येथील नावाजलेले महाविद्यालय म्हणजे वाडिया महाविद्यालयात झालेय.

ई. स. २०१९ पासून विकासने MPSC ची तयारी सुरु केली होती. तब्बल सात वर्षांच्या अथक परिश्रमाचे त्याला गोड फळ मिळालेय.
या अगोदरही राज्यसेवा मुख्य परीक्षा, तसेच गट ब व गट क ची मुख्य परीक्षा यात थोडक्या गुणांनी त्याच्या यशाने हुलकावणी दिलेली होती. मात्र घरची जेमतेम परिस्थिती व त्यातून मिळालेली प्रेरणा यामुळे आणखी जिद्दीने विकास ने अभ्यास करत शेवटी STI पदाला गवसणी घातल्याने, त्याच्या सर्व शिक्षकांसह, मित्र परिवार, नातलग या सर्वांकडून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासिका, की ज्यात विकास सह अनेकांनी त्यात अभ्यास करत यश मिळवले आहे, अशा लायब्ररीत मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी त्याचा सत्कार झाला. तर मातंग समाजातील काही संघटना व नेते मंडळींनीही विकास अवचिते यांचा सन्मान केला आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे