नगर तालुक्यात शिव पाणंद चे झीरो पेंडंसी अभियान यशस्वीपणे राबविणार : मिलिंद कुलथे, तहसीलदार
शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांचा पुढाकार

*अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात शिव पाणंदचे झिरो पेण्डन्सी अभियान यशस्वी राबवणार – तहसिलदार मिलिंद कुलथे
शरद पवळे यांच्या समन्वयातून बैठक संपन्न
अहिल्यानगर :
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद शेत रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी, शेत व शिवरस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटविणे, रस्त्यांची मोजणी, सीमांकन आणि प्रलंबित
प्रकरणांचा जलद निपटारा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले होते.
या निवेदनाची दखल घेत अहिल्ह्यानगरचे तहसीलदार मिलींद कुलथे यांनी शिव पाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालय, अहिल्यानगर येथे समन्वय बैठकीचे आयोजन करत मार्गदर्शन केले.
या बैठकीस उपअधीक्षक भूमी अभिलेख, गटविकास अधिकारी, विविध पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, वन विभागाचे अधिकारी तसेच संबंधित महसूल अधिकारी उपस्थित होते. शेत व शिवरस्त्यांवरील अतिक्रमणे दूर करणे, रस्त्यांची मोजणी व सीमांकन, प्रलंबित तक्रारींचे निराकरण तसेच शेतकऱ्यांना रस्त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाहीवर चर्चा झाली.
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीने शासनाच्या निर्णयानुसार अतिक्रमण हटविणे, प्रलंबित शेतरस्ते तातडीने सुरू करणे, आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच प्रत्येक तालुक्यात समन्वय यंत्रणा उभारण्याची मागणी केली.
प्रलंबित शेतरस्ता प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देत, तिन महिन्यात एकही शेतरस्ता प्रकरण प्रलंबित ठेवणार नाही व लवकरच तहसिल कार्यालयात लोक अदालत घेवून शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची वेळ येवू देणार नाही, असे तहसिलदार मिलिंद कुलथे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तर उपस्थित इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनीही, “आम्ही तहसिलदारांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिले.”
यावेळी पीडित शेतकऱ्यांची लेखी निवेदने चळवळीच्या वतीने स्वीकारून, पुढील कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे शिव पाणंद शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष तथा या चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
या बैठकीसाठी उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे, आशिष कासार, गणेश इंगळे, बाळासाहेब थोरात, सचिन शेळके, अंबादास आव्हाड, पोपट शेळके, अक्षय जगताप, सोमनाथ तोडमल, एकनाथ पवार, रामदास तनपुरे, विठ्ठल मिसाळ, दादासाहेब शिरसाठ, गोवर्धन शिरसाठ, कृष्णा चव्हाण, राजेंद्र शिरसाठ, जालिंदर आठरे, राहुल गट, अंबादास आव्हाड, सुधीर भद्रे, राहुल पवने, विक्रांत कासार यांसह अनेक पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.