भीक मागणे आणि देणे कायद्याने बंदी आहे : शिवाजी खेडकर सामाजिक कार्यकर्ते
भीक मागण्यास प्रतिबंध, अधिनियम १९५९ ची अंमलबजावणी करण्याची मागणी
*भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ अंतर्गत शिरूर तहसील कार्यालयात सा. का. शिवाजी खेडकर यांनी घेतली बैठक*
—————–
शिरूर : दि. 16/04/2026.
बातमी प्रतिनिधी : रवींद्र खुडे, संपादक.
——————

runfunc: 0; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0158,0.0006;
brp_del_sen:0.1000,0.1000;
motionR: 0;
delta:1;
bokeh:1;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 270.75067;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 65537;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 37;zeissColor: bright;
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या नेतृत्वाखाली व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली, शिरूर तहसील कार्यालय येथे 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता एक बैठक संपन्न झाली. विषय तितकाच गंभीर परंतु दुर्लक्षित होता, तो म्हणजे भीक मागणे. आपल्या शासनाने याबाबतचा कायदा, म्हणजे “मुंबईचा भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1959” यापूर्वीच केलेला आहे. मात्र प्रत्येक गाव व शहरात रस्त्यावर सर्रासपणे भीक मागितली जाते. परिणामी भारताचे नाव बाहेरील पर्यटक व इतरांच्या माध्यमातून भीक मागणाऱ्या लोकांचा देश होत असल्याचा अनुभव, रांजणगाव पंचतारांकित MIDC मध्ये येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या लक्षात आले. त्यावर काहीतरी उपाय करायला हवा, या उद्देशाने त्यांनी हा महत्वाचा विषय ऐरणीवर घेतलाय. त्याच अनुषंगाने खेडकर यांनी या विषयाची बैठक शिरूरचे तहसीलदार यांच्यासमवेत घेण्यासाठी संदेश दिला. त्याला प्रतिसाद देत काही सजग नागरिक बिठकीला उपस्थित राहत, यावर साधक बाधक चर्चा झाली. तसेच भीक मागणे या अनिष्ट पद्धतीविरुद्ध मोहीम आखल्याने, शिरूर तालुका हा देशातील पहिला व महत्त्वाचा तालुका ठरणार आहे, की जेथून या विषयाला चालना मिळाली आहे. तसेच आपणच भिकाऱ्यांना भीक देऊन वाईट सवय लावत असल्याने, यावर उपाय म्हणून आजपासून भीक देणे बंद हा निर्णय देखील सर्वांनी घेतला असून, तसा संदेशही सर्वांना दिलेला आहे. मात्र खरे गरजवंत असतील त्यांना काही शासकीय योजना, शासकीय व सामाजिक संस्थांद्वारे योग्य शासकीय योजना देऊन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची गणना करून, त्यांना प्रवाहात आणण्याचा, वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक व विरंगुळा केंद्र, बालसुधार गृह अशा विविध मार्गांचा व ज्यांना जेथे जेथे शक्य आहे, तेथे तेथे लाभ देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी व सामान्य नागरिकांच्या वतीने चर्चेतून करण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला शिवाजी खेडकर यांनी प्रास्ताविक करत त्यांना आलेले अनुभव व या विषयाचे गांभीर्य सर्वांसमोर मांडले. तसेच उपस्थितांनीही आपापली मते मांडण्याची विनंती केली.
त्यावर निवृत्त अधिकारी व अर्थतज्ञ डॉ दिपक गायकवाड यांनी सांगितले की, “smile नावाच्या केंद्रीय संस्थेमार्फत यावर चांगले काम करता येईल, तसेच Human Rights, समाजकल्याण विभागामार्फतही यावर काम करता येईल.”
तुकाराम निंबाळकर यांनी सांगितले की, “ग्रामीण भागात भीक मागण्याच्या नावाखाली काहीजण रेकी (टेहाळणी) करतात, व नंतर चोऱ्या होतात.”
शामकांत वर्पे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शिरूर शहरातील भिकाऱ्यांचा प्रश्न गंभीर असून, तृतीय पंथीय लोक पुणे नगर हायवेवरील काही विशिष्ट ठिकाणी अश्लील चाळे व वेश्या व्यवसाय करत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या सभ्य स्त्री पुरुष व नागरिकांना याचा त्रास होत आहे.”
तर सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप करत स्पष्ट केले की, “शिरूर तालुक्यातील काही महत्वाच्या चौकांमध्ये भिकारी पोलिसांसमोरच भीक मागतात, त्यामुळे असं संशय येतो की याला पोलिसांचेच संरक्षण आहे की काय ? कारण हे भिकारी स्वतःसाठी भीक मागताना दिसत नाहीत तर त्यांचा बॉस असतो, की जो त्यांना चौका चौकात व काही विशिष्ट ठिकाणी भीक मागण्यास सोडतो. प्रत्येक भिकाऱ्याला ठरवून दिलेल्या जागा आहेत, अशा तक्रारी समोर आलेल्या आहेत मात्र पोलीस काहीच कारवाया करताना दिसत नाहीत, त्यामुळे पोलिसांवरील संशय अधिक बळावतो आहे.”
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गणेश जामदार यांनीही या गोष्टीला दुजोरा देत स्पष्ट केले की, “कधी कधी असे वाटते की पोलिस आणि भिकारी यांचे साटेलोटे आहे की काय, कारण तालुक्यात भिकाऱ्यांची टोळी सक्रिय असून, ती चालवणारे त्यांचे गुंड व त्याद्वारे एजन्टगिरीही पाहायला मिळतेय.”
शेतकरी संघटनेचे शरद गद्रे यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की, “मी ज्यावेळी माझा शेतमाल विकण्यासाठी काही बाजारांमध्ये बसतो, तर त्या ठिकाणी मालाची विक्री होऊ अन्यथा न होऊ, काही भिकारी व तृतीय पंथीय कमीत कमी दहा रुपये घेतल्याशिवाय जात नाहीत, न दिल्यास सर्वांसमोर अश्लील भाषा वापरतात, बदनामी करतात.”
सामाजिक कार्यकर्ते योगेश ओव्हाळ यांनीही या सर्व बाबी खऱ्या असून, यावर उपाययोजनेसाठी तालुकास्तरीय कमिटी बनवण्याची मागणी केली.
तर करंजावणे येथील श्रीराम शेलार यांनी अशा भीक मागणाऱ्यांना लोकांनी चोप द्यायला हवा असे मत मांडले, यावर उत्तर देताना तहसीलदार म्हणाले की, कुणीही कायदा हातात न घेता, पोलिसांकडे तक्रार करावी, तसेच येथून पुढे भिकाऱ्यांचा विषय आपण गांभीर्याने घेऊन, उपाययोजना करू असे स्पष्ट केले.
पत्रकार रविंद्र खुडे यांनी शिरूर शहर व तालुक्यातील शालाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्व्हे करून शाळा न शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांचा विषय मांडल्यानंतर, गटशिक्षणाधीकारी प्रीतम कोकणे यांनी या विषयाची दखल घेत यावर नक्कीच उपाययोजना होईल असे आश्वासित केले.
ग्राम पंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजाराम रासकर यांनीही अनेक गावांमध्ये भिकाऱ्यांच्या समस्या भेडसावत असल्याचे स्पष्ट करत, यावर उपाययोजना करण्याचे मत मांडले.
पंचायत समिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी श्रीमती चोभे यांनी आपले मत मांडताना सांगितले की, “आमच्या विभागामार्फत 18 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या मोफत राहण्यासाठी व शिक्षणासाठी वसतिगृह आहेत. भिकाऱ्यांसाठी नाही पण शिक्षणासाठी नक्की सोय होऊ शकते, अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास सर्व सजग नागरिकांनी प्रयत्न करावेत, आमचा विभाग नक्की पुढाकार घेईल.”
शिरूर नगर परिषदेचे प्रशाकीय अधिकारी राहुल पिसाळ यांनीही उत्तर देताना सांगितले की, “जर नगरपालिका हद्दीत असे बाहेरील व्यक्ती, अनोळखी व्यक्ती, भिकारी, दिसून आले तर आमचे कर्मचारी त्यांना हेरतात व त्यांची चौकशी केली जाते, त्यांचे ओळखपत्र पाहून शिरूरचे नसतील तर त्यांना शिरूर नपा हद्दीतून बाहेर जाण्यास सांगितले जाते. तसेच भीक मागण्यास प्रतिबंध म्हणून शासनाने नगर पालिकांना फेरीवाला योजना दिली असून, याद्वारे बिनव्याजी कर्ज अशा गरिबांना व्यवसायासाठी दिले जाते.”
हा विषय ऐरणीवर घेणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्यासह, तालुक्यातील उपास्थित मान्यवरांनी जे मुद्दे मांडले, त्याला उत्तर देत उपाययोजना सुचविण्याचे काम उपस्थित सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी केले.
शेवटी बैठकीतील चर्चेला संबोधित करताना तहसीलदार म्हस्के म्हणाले की, “शहरी भागासह ग्रामीण भागात काही चोरटे भीक मागण्याच्या उद्देशाने येऊन टेहाळणी करून नंतर तेथे चोऱ्या करतात असे आढळल्यास, सजग लोकांनी पोलिसांच्या टोल फ्री 112 क्रमांकावर संपर्क साधावा. तर काहीजण भिकाऱ्यांची एजन्टगिरी, सौदेगिरी करत असतिल, आणि अशा गाड्या आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीत आल्याच्या तक्रारी पोलिसांकडे मिळाल्यास तात्काळ अशा गाड्या व संबंधितांना ताब्यात घ्यावे. कुणालाही हाणामारी न करता, कायदा हातात न घेता पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करावी. शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पं स च्या संबंधित शिक्षण विभागाने सजग नागरिक, काही सामाजिक संस्था संघटनाच्या माध्यमातून भरीव काम करावे. चोऱ्यांमध्ये जर काही लहान बालके असतील तर त्यांना बालसुधारग्रहात टाकण्याची प्रक्रिया करावी. ग्रामीण भागात ग्राम पंचायत व पोलिस पाटील यांचे महत्वाचे काम असून, सजग नागरिकांच्या सहकार्याने काम हाती घ्यावे.”
या बैठकीसाठी रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी निळकंठ तिडके, शिक्रापूर पो स्टे चे पोलीस अधिकारी म्हसकर, शिरूर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी जे के लहामटे, गटशिक्षणाधिकारी प्रीतम कोकणे, पंचायत समिती महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती चोभे, नगर परिषदेचे प्रशासकीय अधीकारी राहुल पिसाळ, आदी अधिकाऱ्यांसह पत्रकार रवींद्र खुडे, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी तसेच सजग नागरिक उपस्थित होते.