राजकिय

शिरूरच्या रेश्मा रफिक शेख यांची भाजप महिला आघाडी प्रदेश कार्यकारिणीत सचिव पदी नियुक्ती

भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केल्या अनेक नियुक्त्या.

0 0 8 2 3 4

शिरूर

शिरूरच्या रेश्मा रफिक शेख यांची भाजप महिला आघाडी (पुणे ग्रामीण) प्रदेश सचिव पदी पुन्हा एकदा निवड
———
बातमी : रविंद्र खुडे, संपादक, खुडेज टूडेज न्यूज (9422650735)
———

  1. भाजप महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी, राज्याच्या महिला आघाडीच्या प्रमुखांच्या नुकत्याच नियुक्त्या दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या निवडी केल्याचे त्यांनी जाहीर केले.
    यात भाजप महिला मोर्चासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे 100 महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी, गुरुवार दि. 23/07/2026 रोजी करण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेय.
    यात कोषाध्यक्ष 1, कार्यकारिणी सदस्य 7, महामंत्री 8, उपाध्यक्ष 27 व सचिव 55 अशा जवळ जवळ 98 महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्यात.
    यात पुणे जिल्ह्यातील शिरूर (घोडनदी) येथील रेश्मा रफिक शेख यांची पुन्हा निवड झाल्याने शिरूरमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतेय. त्यांच्यावर पुणे ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली असून, आत्तापर्यंत त्यांनी विविध योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांना व विशेषतः महिलांना मिळवून दिलाय. भाजपशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांना अल्पसंख्यांक विभागावरून बढती देत, थेट चित्राताईंनी प्रदेशाच्या महिला कार्यकारिणीत घेतल्याने शिरूर च्या महिलेला संपूर्ण पुणे जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शिरूर भाजप सह अन्य तालुक्यातील भाजप कार्यलयांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.
    चित्राताई वाघ यांच्या म्हणण्यानुसार, पदं ही केवळ शोभेला नकोत तर त्यांचा वापर तळागाळातील सर्वसामान्य जनतेला व्हायला पाहिजे, हेच ध्येय समोर ठेऊन मी काम करत आलेय व करत राहील असे मत, रेश्मा शेख यांनी या नियुक्तीला उत्तर देताना व्यक्त केलेय.
5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे