पुणे भाजपचा पदाधिकारी Adv संजय सावंत यांना अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक ?
वकिलासह पत्नी व मुलीला अटक झाल्याने खळबळ

*पुणे भाजप पदाधिकारी Adv. संजय सावंतला महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक?*
———–
शिरूर/पुणे : दि. 18/04/2026.
———–
भाजपच्या पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष Adv. संजय सावंतला अनैतिक संबंधातून सेक्रेटरीचा खून केल्याच्या संशयाने पुणे शहर पोलिसांनी अटक केलीय. विशेष म्हणजे संजय सावंत सोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खुनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडालीय.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, सौ. पुनम मुन (वय 35 वर्ष) या सावंत यांच्या मुंढवा येथील खाजगी कार्यालयात गेली 2-3 वर्षांपासून काम करत होत्या. सौ पूनम यांचे आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण सावंत यांच्या पत्नी सौ स्वाती सावंत यांना लागल्याने, त्यातून पूनम व स्वाती यांच्यात वाद होत होते. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरूवार दि. 16 एप्रिल 2026 रोजी, Adv. संजय सावंत यांच्या कार्यालयात संजय सावंतची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीने पुनम मुन यांना मारहाण केली. त्यानंतर पुनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांना बॅटने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये पुनम मुन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुनम मुन यांचा मृतदेह पोत्यात भरुन ते पोते ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा सावंत यांचा विचार होता. पुनम मुन यांच्या पतीने आपली पत्नी घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते Adv. संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात एक पोते आढळून आले. ते पोते त्यांनी उघडून पाहिले असता, त्यात पुनम मून यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला. पोलीसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीलाही अटक केलेली आहे.
सौ पूनम गेल्या दोन तीन वर्षांपासून सावंत याच्या कार्यालयात सहायक (सेक्रेटरी) म्हणून काम करत होत्या. गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे ऑफिसला आल्या होत्या. दुपारच्या सुमारास पूनम यांच्या पतीने पूनमला फोन केला होता. मात्र पूनम यांनी फोन न उचलल्याने व रात्री आठ वाजले तरीदेखील पूनम घरी न आल्याने त्यांनी ॲड. संजय सावंत याच्याशी मोबाइलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आली नसल्याचे सांगितले. त्यावेळी ॲड. सावंत याने पूनम मैत्रीण किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्या असाव्यात असे उत्तर दिले. रात्री 11 वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते Adv. संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात एक पोते आढळून आले. ते पोते त्यांनी उघडून पाहिले असता, आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आला.
Σ´
मात्र पुण्यासारख्या शहरात एका मात्र पुण्यात न्यायाच्या रक्षकानेच महिलेचे भक्ष केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे असा वकील की जो भाजपचा पदाधिकारी आहे. ज्याचे संबंध शिरूरसह पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील लोकांशी होते. खुद्द मुख्यमंत्री तथा ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच जगदीश मुळीक यांच्यासह अनेक आमदार, खासदार व मंत्र्यांबरोबर सलगी असणाऱ्या व सोशल मीडियावर नेहमी असे फोटो स्वतःच्या अकाउंटवर प्रदर्शित करणाऱ्या भाजप च्या पदाधिकारी वकिलाने असे कृत्य केल्याने याबाबत सर्वत्र चर्चा सुरु असून, सावंत प्रकरणात पुढे काय होणार ? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.