ब्रेकिंग

शिरूरला गोळीबारात एक तरुण ठार

शिरूर गँगवारच्या विळख्यात ?

0 0 8 2 3 4

सोमवार दिनांक 01/06/2026 रोजी संध्या. 5 ते 5:30 वा. चे दरम्यान मौजे सरदवाडी, तालुका शिरूर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत न्हावरा फाटा ते न्हावरा जाणाऱ्या रोडवर राजस्थान ढाब्यासमोर इसम नामे 1) उमेश अनिल जगदाळे वय 26 वर्ष राहणार शिरूर 2) केदार झाडगे राहणार शिरूर 3) विशाल काळे राहणार शिरूर असे तिघेजण त्यांच्याकडील टोयोटा टायझर कार नंबर MH 12 XQ 5104 यामध्ये ते न्हावरा बाजूकडून शिरूर बाजूकडे जात असताना राजस्थान ढाब्यासमोर न्हावरा फाटा बाजूकडून न्हावरा गावाकडे जाणाऱ्या किया सोनेट कार नंबर एम एच 14 .. 1128 यामधून आलेल्या अज्ञात इसमांनी टोयोटा टायझर गाडीस ठोस दिली व सोनेट कारमधून चार ते पाच अज्ञात इसम यांनी खाली उतरून, वरील टोयोटा टायझर गाडीच्या पुढच्या काचेवर 4 round फायर केलेले आहेत.
त्यामुळे टोयोटा टायझर कारमधून वरील तीनही इसम खाली उतरून पळू लागले. तेवढ्यात सदर ठिकाणी एका मोटरसायकलवर दोन इसम आले त्यापैकी रेकॉर्डवरील आरोपी नामे सनी यादव व त्याच्या इतर साथीदारांनी वरील तीनही इसमांवर फायरिंग केली आहे. घटनास्थळी इसम नामे विशाल काळे वय 30 वर्ष राहणार शिरूर हा मयत स्थितीत असून त्याच्या तोंडावर दगड मारल्याची मोठी जखम झाल्याचे दिसत आहे. त्याचे बॉडी जवळ दोन खाली केस (राऊंड) पाडलेले दिसले. तसेच चार ते पाच मोठी दगडे पडलेली होती. दुसरा इसम केदार झाडगे राहणार कुंभार आळी शिरूर हा देखील जखमी झाला असून त्याच्या कपाळाला मोठी जखम झाली असून, पाच टाके पडलेत. त्याच्यावर सरकारी रुग्णालय शिरूर येथे उपचार चालू आहेत. तिसरा इसम नामे उमेश अनिल जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेलेला होता, मात्र नंतर तो पोलीस स्टेशनला हजर झाला.
यामधील एकूण 5 ते 6 आरोपी एक फोर व्हीलर सोनेट कार व एका टू व्हीलर वर आलेले असून घटनेनंतर ते घटनास्थळावरून फरार झालेले आहेत.
घटनास्थळी शिरूर पोलीस स्टेशन कडील पथके दाखल झाली, तसेच फॉरेन्सिक टीमलाही बोलाविण्यात आलेले होते.
घटनेतील आरोपी सनी यादव व त्याचे इतर 5 ते 6 साथीदार यांचा शोध घेण्याकरिता वेगवेगळी पथके रवाना केली असल्याचे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.
सदर घटनेमधील मयत विशाल काळे हा रेकॉर्ड वरील आरोपी आहे तसेच फायरिंग करणारे आरोपी पैकी सनी यादव राहणार बकोरी फाटा वाघोली तालुका वाघोली जिल्हा पुणे हा देखील रेकॉर्ड वरील आरोपी आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे