ब्रेकिंग

मतदानाच्या हक्कासाठी शिरूरच्या तरुणाचा थेट उपोषणाचा इशारा

संग्राम शेवाळे या तरुणाच्या उपोषणाच्या ईशाऱ्याने खळबळ

0 0 8 2 3 4
  • *मतदानाच्या हक्कासाठी युवकाचा उपोषणाचा इशारा*

शिरूर : दि. 29/05/2026.

मतदानाचा हक्क मिळत नसल्याने शिरूर तालुक्यातील बाभुळसर (खुर्द) येथील युवक संग्राम संतोष शेवाळे याने प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्याने शिरूरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
संग्राम शेवाळे या तरुणाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय संविधानानुसार १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. माझी जन्मतारीख ७ ऑक्टोबर २००६ असून, माझी वयाची १८ वर्षे पूर्ण होऊनही, मला मतदानाचा अधिकार मिळालेला नाही” अशी खंत त्याने या पत्राद्वारे व्यक्त केलीय.

संग्राम च्या या निवेदन पत्रामुळे खरोखरच एक नवीन व गंभीर विषय समोर आल्याने, निवडणूक आयोग व शासकीय हलगर्जीपणा यात दिसून येत असल्याचे अनेकांनी प्रसार माध्यमांशी चर्चा करताना स्पष्ट केलेय.
देशभरातील अनेक युवक-युवतींनाही अशाच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे त्याने आपल्या निवेदनातून निवडणूक विभागाला निदर्शनास आणून दिलेले आहे. तसेच २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनापर्यंत जर मतदानाचा अधिकार मिळाला नाही, तर तहसील कार्यालय शिरूर समोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही त्याने दिलेला आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी पुणे तसेच शिरूर पोलिस स्टेशन यांनाही दिल्या आहेत.

संग्राम शेवाळे यांच्या या निवेदनाची दखल, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तात्काळ घेत, सदर बाबतचे पत्र तातडीने निवडणूक शाखा पुणे चे ऊपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवले आहे.

या विभागाकडून राज्य निवडणूक अधिकारी तसेच भारतीय निवडणूक आयोगाकडे यासाठी पत्रव्यवहार होईल का ? तसेच या ज्वलंत व गंभीर प्रश्नाची दखल खरच भारतीय निवडणूक आयोग किंवा संबंधित विभाग किती तत्परतेने घेतो ? याकडे पाहणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे या अर्जावर निर्णय घेण्यासाठी सुमारे महिना भराची मुदत, संग्राम शेवाळे तसेच त्याच्या सोबतच्या तरुणांनी दिल्याने, खरंच या अर्जाची योग्य दखल निवडणूक विभाग घेतो ? की या तरुणांना २१ जून २०२६ रोजी म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी, आपल्या न्याय्य मागणीसाठी उपोषणाला बसण्याची वेळ येते ? याकडेच सर्व शिरूरकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे