महाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा बसविण्याची मातंग समाज मेळाव्यात मागणी : नगरसेवकांनीही दिले आश्वासन

मेळाव्यात अबकड ऊपवर्गीकरणासह अनेक विषयांवर चर्चा

0 0 8 2 3 4
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
runfunc: 0; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
motionR: 0;
delta:1;
bokeh:1;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 319.25024;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 33;zeissColor: bright;
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
runfunc: 0; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0050,0.0001;
brp_del_sen:0.1000,0.1000;
motionR: 65536;
delta:1;
bokeh:1;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 34;zeissColor: bright;

*मातंग ऐक्य मेळाव्यात नगरसेवकांचे आश्वासन : लाल टाकी परिसरात आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणार*

अहिल्यानगर : दि. 13/07/2016.
बातमी प्रतिनिधी : रवींद्र खुडे, संपादक, खुडेज टूडेज न्यूज.
———
अहिल्यानगर शहरातील MIDC जवळ असलेल्या, बोल्हेगाव परिसर सकल मातंग समाजाच्या वतीने, शनिवार दि. 11 जुलै 2026 रोजी संध्याकाळी राघवेंद्र स्वामी मंदिर हॉल मध्ये, ‘मातंग ऐक्य मेळावा’ संपन्न झाला. यात अनुसूचित जातीतील अबकड ऊप वर्गीकरणासह समाजातील लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासह अनेक मुद्दयांवर चर्चा झाली.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात लाल टाकी परिसरातील आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौकात, लहुजींचा भव्य व पूर्णाकृती ब्रॉन्झ पुतळा उभारण्याची महत्वाची मागणी करण्यात आली. यावेळी अहिल्यानगर महानगरपालिकेचे बोल्हेगावचे नगरसेवक कुमारभाऊ वाकळे व नगरसेविका श्रीमती आशाताई कातोरे, नवनाथ कातोरे, किसन भिंगारदिवे व अन्य नेते मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी, मातंग समाजाचे महापुरुष पैलवान उस्ताद व आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, यांचा पुतळा उभारणीच्या मागणीला जाहीर पाठिंबा देत, महानगरपालिका महासभेत तातडीने ठराव मंजूर करून हा पुतळा उभारला जाईल असे ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भीमराव साळवे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नानाभाऊ गाडे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी ॲड. प्रदीप सकट यांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा उभारणी संदर्भातील आतापर्यंतचा कायदेशीर प्रवास आणि प्रशासकीय प्रक्रियेची सविस्तर माहिती उपस्थितांना व नगरसेवकांना समजावून सांगितली. कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा पुतळा कसा लवकरात लवकर उभा राहू शकतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. यानंतर सकल मातंग समाजाच्या वतीने लाल टाकी येथील चौकात हा पुतळा उभारण्याकामी महानगरपालिकेच्या महासभेत रीतसर ठराव घेऊन तो मंजूर करण्यात यावा, अशी विनंती उपस्थित सर्व नगरसेवकांना करण्यात आली. समाजाच्या या न्याय्य मागणीला व कायदेशीर तयारीला मान देत, उपस्थित लोकप्रतिनिधींनी महासभेत हा विषय लावून धरून ब्रॉन्झचा भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले.

*अहिल्यानगरशी असलेले ऐतिहासिक नाते आणि योगदान :*
मेळाव्यात आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या नगर भूमीशी असलेल्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यात आला. महात्मा फुले यांनी दीनदुबळ्यांना व महिलांना साक्षर करण्याचे ठरवले, तेव्हा सावित्रीबाई फुले यांच्या नगर येथील प्रशिक्षण प्रवासाची आणि फातिमा शेख यांच्यासोबतच्या शैक्षणिक कार्यातील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी लहुजी वस्ताद साळवे यांनी अत्यंत निष्ठेने पेलली होती. कवठ्याची तालीम हे या क्रांतीचे मोठे केंद्र होते. एवढेच नव्हे तर, इंग्रजांच्या पाठिंब्याने गरीब शेतकऱ्यांना लुटणाऱ्या जुलमी सावकारांचे गहाणखतांचे दस्तऐवज भरचौकात आणून ते जाळून टाकण्याचे धाडसी सामाजिक कार्य लहुजी वस्ताद यांनी केले. अशा या महापुरुषाच्या विचारांनीच भारताच्या शिक्षणाची पहाट उगवली, असा गौरवपूर्ण इतिहास यावेळी मान्यवरांनी मांडला.

*वक्त्यांचे विचार आणि संघर्ष :*
मेळाव्याचे प्रास्ताविक सकल मातंग समाजाचे जिल्हा समन्वयक भगवान जगताप यांनी मांडले. तर शहरातील कार्यकर्त्यांचा लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यासाठीचा ऐतिहासिक संघर्ष संदीप सकट यांनी उपस्थितांसमोर ठेवला. शाम वैराळे यांनी बोल्हेगाव परिसरातील सकल मातंग समाजाने पुतळा उभारणीसाठी चालवलेल्या धडपडीचे आणि योगदानाचे विशेष कौतुक केले.
मातंग एकीकरण समितीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र शेलार यांनी, आरक्षण उपवर्गीकरणाबाबत मातंग समाजाची सद्यस्थितीतील भूमिका स्पष्ट केली. मातंग समाजाला त्याचा न्याय्य हक्क मिळण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण अत्यंत आवश्यक असून, यापुढील काळात होणाऱ्या सर्व आंदोलनांमध्ये समाजातील प्रत्येक घटकाने आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आग्रही आवाहन त्यांनी केले.

  1. या मेळाव्यासाठी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, ज्येष्ठ नेते अनिल शेकटकर, नामदेवराव चांदणे, प्रतिबिंब सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादू नेटके, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, निवृत्त मुख्याध्यापक म्हातारदेव साबळे, सुखदेव साबळे, जालिंदर शेलार, बाळासाहेब वाघमारे, सुनिल भोसले, पावलं पवार, रामदास ठोकळ, रघुनाथ साळवे, राम वाघमारे, विकी वैराळ, विनोद शिंदे, रणजित वैरागर, सचिन शिंदे, संतोष शेंडगे, ताराचंद जगधने, किशोर साळवे, विजय वडगळे, गौरव घोरपडे, राहुल शेकटकर, विठ्ठल गाडे, संजय उमाप, सचिन शेकटकर, अरुण डाके, संजय जगताप, लक्ष्मण शिंदे यांच्यासह बोल्हेगाव परिसरातील सकल मातंग समाजाचे नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे संयोजकांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पाचर्णे सर यांनी केले तर आभार ताराचंद जगधने यांनी मानले.
5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे