गुन्हेगारी

शिरूरला मागासवर्गीयांची लाखो रुपयांची फसवणूक ? गोसावी व वर्षा शेख (रासकर) विरुद्ध पोलिसांना निवेदन दाखल

फसवणूक करणारी महिला फरार ? संशयाला पुरेसे बळ

0 0 8 2 3 4

शासकीय कर्जाचे आमिष दाखवून शिरूरला लाखोंची फसवणूक? वर्षा शेख, सुप्रिया गोसावी यांच्याविरोधात शिरूर पोलिसांकडे निवेदन ?
—–

शिरूर,) : दि. १४ जुलै २०२६.

महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून, अनेक महिला व पुरुषांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करत, सौ. वर्षा इम्रान सौदागर शेख (उर्फ वर्षा शिंदे रासकर) व सौ. सुप्रिया स्वप्नील गोसावी यांच्याविरोधात, शिरूर पोलीस ठाण्यात सामूहिक निवेदन दाखल करण्यात आले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांनी शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत प्रोसेसिंग फी, फाईल चार्ज, कागदपत्रांचा खर्च आदी कारणे सांगून प्रत्येक अर्जदाराकडून रु. ५,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंत रोख रक्कम व ऑनलाइन स्वरूपात रक्कम घेतली असून, पैसे घेतल्यानंतर कोणत्याही अर्जदाराला शासकीय कर्ज मिळाले नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या फसवणूकीच्या प्रकारात शेकडो महिला व पुरुषांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून, फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांशी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT/NT) तसेच इतर समाजघटकांतील नागरिकांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदारांनी संबंधितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडितांची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी केलेली आहे. तसेच वेळेत कारवाई न झाल्यास शिरूर पोलीस ठाण्यासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिlला आहे.
त्यामुळे आता या फरार महिलेचा शोध लागल्यावरच पुढील गोष्टी समोर येतील. त्यामुळे शिरूर पोलिसांच्या चौकशीकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

4.3/5 - (3 votes)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे