ब्रेकिंग

शिरूर तालुक्यात पुन्हा एका चिमुकलीचा बिबट हल्यात मृत्यू

पिंपळसुटी सह तालुक्यात हळहळ व्यक्त

0 0 8 2 3 4

शिरूर/पिंपळसुटी
*बिबट्याच्या हल्यात शिरूरमध्ये पुन्हा एका चिमुकलीचा बळी*
——-
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या पिंपळसुटी गावात, एका गोठ्यात झोपलेल्या मजुराच्या चिमुकलीचा बळी पुन्हा एकदा गेल्याने, शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, पिंपरखेडची कु. रोहन विलास बोंबे या मुलाची घटना ताजी असतानाच, ही घटना काळीज पिलवटून टाकणारी आहे. त्यामुळे आता शासन व प्रशासन काय काय उपाययोजना करते ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. एवढ्या पंधरवड्यात शिरूर तालुक्यातील अनेक भागात बिबट जेरबंद झाल्याची माहिती, शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी वेळोवेळी दिली होती. आता ही पिंपळसुटी मधील नरभक्षक बिबट ची घटना, परिसरातील लोकांना खूप त्रासदायक ठरणार आहे. तो बिबट जोपर्यंत जेरबंद होत नाही, तोपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना व लोकांना आपला जीव सांभाळून सर्व कामे करावी लागणार आहेत.
या घटनेबाबत शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व वनपाल भानुदास शिंदे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, “पिंपळसुटी परिसरात आधीच 4 पिंजरे लावलेले होते व आत्ता आणखी पिंजरे लावून, एकूण पिंजऱ्यांची संख्या 14 झालली आहे. अजुन बिबट पिंजऱ्यात अडकलेला नसून, त्याचा शोध ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सुरु आहे.”
पिंपळसुटी येथे बिबट्याने ठार केलेल्या लहान मुलीबद्दल सविस्तर माहिती अशी की, “कु. भाग्यश्री संदीप वारे, वय वर्ष 5, मूळ गाव करोडी, ता. पाथर्डी, जी. अहिल्यानगर, सध्या राहणार पिंपळसुटी, ता. शिरूर, जी. पुणे ही एका शेतमजूराची मुलगी असून, ती तिच्या घरच्यांसह गोठ्यात झोपलेली असता, बुधवार दि. 22/07/2026 रोजी रात्री पावणेतीन च्या आसपास बिबट्याने तीला अलगद उचलून शेजारीच 50 मीटर अंतरावर असलेल्या गणेश सोनवणे यांच्या उसात नेत असताना, मुलीचा आरडा ओरडा ऐकू आल्याने शेजारी झोपलेल्या या चिमुकलीचे चुलते बाबासाहेब कोंडीबा वारे, वय 36 वर्ष व चुलती यांना जाग आली व त्यांनी आरडा ओरडा केला. त्यामुळे त्यांचे शेत मालक मच्छिन्द्र प्रल्हाद भोसले यांना माहिती सांगताच त्यांनी वनविभाग व ग्रामस्थ्यांना संपर्क साधला. त्यांच्या मदतीने या मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली. तीला आंब्युलन्स मधून ग्रामीण रुग्णालय न्हावरे येथे नेली असता, ती मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.”

        ही घटना खूप वेदनादायी असल्याने, तात्काळ परिसरात पिंजऱ्यांची संख्या 4 वरून 14 करण्यात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले असून, जुन्नर चे उप वनसंरक्षक प्रशांत खाडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले असून, या बिबट्याचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न सुरु आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे