शिरूरचे RFO नीलकंठ गव्हाणे यांना युवा क्रांती फौंडेशनचा पुरस्कार प्रदान

*RFO नीलकंठ गव्हाणे यांना युवा क्रांती फौंडेशनचा पुरस्कार प्रदान *
———
बातमी : रवींद्र खुडे, संपादक, खुडे’ज टुडे’ज न्यूज( 9422 650 735)-
——–
शिरूर : दि. 15/02/2026.
युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत, “पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे फॉरेस्ट अधिकारी RFO नीलकंठ गव्हाणे, यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्यासाठी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा व जनहितासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल, “कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार रविंद्र सूर्यवंशी (संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष) तसेच डॉ. अशोक गोविंद नगरकर (DRDO ज्येष्ठ शास्त्रज्ञ व संचालक) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचाही ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान समारंभ विणकर सभागृह, पद्मावती नगर, पुणे येथे दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत संपन्न झाला.
RFO नीलकंठ गव्हाणे यांनी सन्मानाला उत्तर देताना म्हटले की,”असे पुरस्कार हे समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा पुरस्कारांमुळे काम करण्यास आणखी ऊर्जा मिळते. तसेच पुरस्कार देणाऱ्या अशा संस्था व संघटनांचेही कौतुक करावे तेवढे कमीच असते. या संस्थेच्याही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”