इस्रो – नासा परीक्षेत शिरूर तालुक्यातील निमोणे जीप शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
तर काही विद्यार्थी दिल्ली भेटीच्या प्रतिक्षा यादीत

इस्रो – नासा परीक्षेत निमोणे जीप शाळेतील विद्यार्थ्यांचे च्या विद्यार्थ्यांचे यश
——–
शिरूर : दि. 23/08/2026.
बातमी : रविंद्र खुडे, संपादक 9422650735..
——–
शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षेंसोबतच जिल्हा परिषद शिक्षण विभाग हा राज्य सरकारच्या माध्यमातून विविध संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षा घेत असते. त्याच अंतर्गत इस्रो–नासा परीक्षा २०२६ ही देखील घेण्यात आली होती. यात शिरूर तालुक्यातील निमोणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या पहिल्या चाचणीत तब्बल १८ हजार ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून दुसऱ्या चाचणीसाठी १ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी २५८ विद्यार्थीbपात्र ठरले. या २५८ विद्यार्थ्यांमधून नासाच्या अमेरिका दौऱ्यासाठी केवळ २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली असून, यात निमोणे जि. प. शाळेची विद्यार्थिनी कु. सानवी समीर काळे हिने स्थान मिळविले आहे. सानवीच्या या उल्लेखनीय यशामुळे निमोणे गावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच जिल्ह्यातून एकूण २५ विद्यार्थ्यांची युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) दौऱ्यासाठी, तर ५० विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. उर्वरित १५८ विद्यार्थी वेटिंग लिस्टवर असून, त्यांच्यासाठी किमान राष्ट्रपती भवन भेटीचा दौरा निश्चित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या वेटिंग लिस्टमध्येही निमोणे जि. प. शाळेची विद्यार्थिनी कु. आर्या रमेश काळे हिने स्थान मिळविले आहे. त्यामुळे एकाच शाळेतील सानवी काळेची नासासाठी निवड आणि आर्या काळेचा वेटिंग लिस्टमध्ये समावेश, ही निमोणे शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
वर्गशिक्षक नवनाथ नाना निचित यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल थोरात, मुख्याध्यापक सच्चितानंद थेऊरकर, केंद्रप्रमुख उमेश जाधव, विस्तार अधिकारी रघुनाथ पवार, गटशिक्षणाधिकारी प्रीतम कोकणे आदींनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अंतराळ विज्ञानाची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नवी दिशा देणारे ठरत आहे. सानवी व आर्या यांच्या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर नुकतेच जी प चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील हे शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनीही तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केलेले होते.