आरोग्य व शिक्षण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “जर्नल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट थॉट्स चे प्रकाशन “

मा. प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख यांच्या जर्नल चे प्रकाशन

0 0 2 9 7 7

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जर्नल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट थॉट्स’चे उत्साहात प्रकाशन
———
(बातमी : रविंद्र खुडे, संपादक, शिरूर)
पुणे : दि. २५ मार्च २०२६
———

       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्कायलार्क प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि इंडियन जर्नल्सच्या यादीमध्ये सूचीबद्ध असलेल्या ‘जर्नल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट थॉट्स’ या शोधनिबंधपर त्रैमासिक पत्रिकेचे प्रकाशन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते प्र-कुलगुरू कार्यालयातील सभागृहात उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना डॉ. काळकर यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या जागतिक परिस्थितीत नाविन्यपूर्ण आणि संशोधनाधारित विचारांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “हे जर्नल संशोधकांसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरेल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जर्नलचे संपादक प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख आणि संपादक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.

जर्नलच्या सद्य आवृत्तीमध्ये मुख्यत्वे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामांच्या अभ्यासावर आधारित संशोधनपर लेखांचा समावेश असून, हे त्रैमासिक जर्नल वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनाला चालना देत आहे. विविध आंतरविद्याशाखीय अशा १४ विषयांवरील संशोधन निबंध प्रकाशित करण्यात आले आहेत. “या जर्नलमुळे संशोधकांना वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर आधारित दर्जेदार संशोधन प्रकाशित करण्याची संधी उपलब्ध होते,” असे प्रतिपादन संपादक प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास अधिष्ठाता प्रा. डॉ. सुप्रिया पाटील (वाणिज्य व व्यवस्थापन), प्रा. डॉ. जी. श्यामला (विभाग प्रमुख, वाणिज्य), डॉ. अनिल करंजकर, डॉ. अशोक कांबळे, डॉ. संजय कंदलगावकर, डॉ. शिल्पा भिडे, डॉ. राधाकृष्ण पंडित, डॉ. कविता कामथ, डॉ. नसरीन खान यांसह अनेक मान्यवर व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रवीण कड यांनी मानले.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 9 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे