ब्रेकिंग

शिरूर तहसील मधील लोकसेविकेला लाच घेताना अटक

महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..?

0 0 2 9 7 7

*शिरूर तहसील मधील लोकसेविकेला लाच घेताना अटक*
———————

दि. 17/01/2026.

शिरूर/पुणे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयातील
लोकसेविका श्रीमती प्रमीला वानखेडे, वय 44 वर्षे, पद ग्राममहसुल अधिकारी, सजा शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे, रा. खराडी बायपास, पुणे यांनी तक्रारदार यांचे जमिनीचा पंचनामा त्यांचे बाजुने करून देणेकरीता, तसेच इथुन पुढे या कामात मदत करणे करीता म्हणुन 10,000/- रु. लाच रकमेची मागणी करून, दिनांक 16/01/2026 रोजीचे पडताळणी दरम्यान पंचासमक्ष तडजोडीअंती 7,000/- रु. लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे कबूल केले व दिनाक 16/01/2026 रोजी त्यांनी छत्रपती संभाजी चौक, न्हावरे तळेगावरोड, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे येथे पंचासमक्ष 7,000/- रूपये लाच रक्कम स्वीकारली. म्हणुन लोकसेविका श्रीमती प्रमीला वानखेडे, यांनी सरकारी पदाचा दुरूपयोग करून तक्रारदार यांचे वडीलोपार्जित जमिनीचा पंचनामा हा तक्रारदार यांचे बाजुने करुन देणेकरीता, तसेच येथुन पुढे मदत करणे करीता म्हणुन रु. 7,000/- लाच रक्कम स्वीकारली आहे. म्हणून त्यांचेविरूदध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये सरकारतर्फे कायदेशीर तक्रार करण्यात आली असून, ही तक्रार लाचलूचपत विभाग पुणे चे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांनी सरकारतर्फे केलेली आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील ऊपअधीक्षक भारती मोरे या करत असून, पुढील चौकशीसाठी लोकसेवक श्रीमती वानखेडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

(कळालेल्या माहितीनुसार त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पास झाल्या होत्या व याच महिन्यात त्यांची मुलाखतही होती. मात्र मोठे अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आता संपुष्टात येणार असे दिसते आहे.)

3/5 - (2 votes)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 9 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे