पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये २ कोटींच्या वर किंमतीचा अंमलीपदार्थ (एम डी ड्रग्स) सापडला चक्क गॅरेज चालकाकडे ?
१ किलोच्यावर अंमली पदार्थ ग्रामीण भागात सापडल्याने एकच खळबळ
-
अबब ! शिरूरला २ कोटींचा एम डी (मेफेड्रोन) ड्रग्स चक्क गॅरेज वाल्याकडे ?
——————–
शिरूर : दि. १९ जाने २०२६. ————— पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत, शिरूर शहराला लागून असणाऱ्या बाबुरावनगर या ऊपनगरात, १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२. १० वाजता, अमली पदार्थ बाळगणारा शिरूर डंबेनाला येथील रहिवासी असणारा तसेच गॅरेज चालविणारा इसम नामे शादाब रियाज शेख, वय वर्ष ४१ याला स्थानिक गुन्हे शाखा पुणे व शिरूर पोलिसांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत, त्याला शीताफिने ताब्यात घेतलेय. त्याच्या जवळ १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा एम डी (मेफेड्रोन) ड्रग्स (अंमली पदार्थ) मिळून आलाय. या व्यक्तीच्या जवळील गुन्ह्यात वापरण्यात येणारी दुचाकीही ताब्यात घेण्यात आली असून, या सर्वांची किंमत २,१०,४०, ०००/- रु आहे. (दोन कोटी १० लाख ४० हजार रुपये) आहे. -
एवढ्या मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्स विरोधातील ही कारवाई असून, या घटनेने मात्र शिरूरकरांची चिंता वाढलेली आहे. कारण आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या या तालुक्यात व विशेषतः शिरूर शहाराजवळ हा ड्रग्सचा मोठा साठा सापडला असून, शिरूर सह परिसरात नावाजलेल्या शाळा व महाविद्यालये आहेत. यापैकी एका नावाजलेल्या शाळेत काही महिन्यांपूर्वी काही विद्यार्थ्यांकडे असेच एम डी ड्रग्स मिळून आले होते. मात्र बदनामी होऊ नये व शैक्षणिक क्षेत्रात वादळ उठू नये यामुळे हे प्रकरण अगदी सोप्या पद्धतीने हाताळले गेले होते. मात्र अशा प्रकारचे एम डी ड्रग्स शिरूर मध्ये येतेच कसे हा प्रश्न जाणकार करत होते. आतातर किलोभर एम डी ड्रग्स शिरूर मधून मिळून आल्याने, मोठी चिंतेची बाबा पालक वर्गात निर्माण झाली असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश कारण्याची मागणी पालकांकडून होत आहे. कारण अंमली पदार्थांच्या आहारी तरुण पिढी जायला नको यासाठी सरकार खुप प्रयत्न करत आहे.
दरम्यानच्या मागील काही काळात शिरूर पोलिसांनीही अनेक पान टपऱ्यांवर अशाप्रकारचे एम डी व इतर ड्रग्स विक्री होत असल्याच्या गोपनीय तक्रारी आल्याने कारवाया केलेल्या होत्या. मात्र आजही मोठ्या प्रमाणावर पान टपऱ्या व इतर ठिकाणी गुटखा, गुटखाजन्य पदार्थ मावा व तत्सम नशेले पदार्थ मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता शिरूर पोलीस तसेच जिल्हा पोलिस प्रमुखांनी या बाबी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
मात्र एवढी मोठी कारवाई पुणे व शिरूर पोलिसांनी केल्याने, जाणकार लोकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, ऊप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सपोनि दत्ताजीराव मोहिते, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोसई पंडित मांजरे, पोलीस मुख्यालयाचे पोकॉ पोपट गायकवाड, स्था गु शा चे अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीन, निलेश शिंदे, राहुल पवार, योगेश नागरगोजे, समाधान नाईकनवरे, भाऊसाहेब पुंड, सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, अंबादास थोरे, सचिन भोई या पथकाने केली असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस ऊपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.