शिरूर नपा मार्फत महिला दिनानिमित्त नारी सन्मान सोहळा २०२६ व खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न
लाखोंच्या बक्षिसांचे शिरूरकर महिलांना वाटप

शिरूर नगरपरिषदेमार्फत महिला दिनानिमित्त नारी सन्मान सोहळा २०२६ व खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न.
———
बातमी : रवींद्र खुडे, संपादक.
शिरूर : दि. १२/०३/२०२६.
———
शिरूर नगरपरिषद (घोडनदी) महिला व बालकल्याण विभागामार्फत आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त, गुरुवार दि. १२/०३/२०२६ रोजी शिरूर नगर परिषदेच्या सेंटर शाळा मैदानात, शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली “नारी सन्मान सोहळा २०२६ तसेच खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने शिरूर नगरपालिका शाळा क्र. ०४ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शिरूर न पा चे मुख्याधिकारी प्रितम पाटील, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा सय्यद, ऊपसभापती स्वप्नाली जामदार, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व विद्युत पुरवठा समिती सभापती डॉ सुनीता पोटे, नियोजन, विकास, गृहनिर्माण, टपरी व झोपडपट्टी पुनर्वसन समिती सभापती स्वाती साठे, सार्वजनिक बांधकाम विभाग सभापती सुनील जाधव, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य विभाग समिती सभापती एजाज बागवान, नगरसेविका श्रीमती संगीता मल्लाव, नगरसेविका चारुशीला कोळपकर, नगरसेविका सविता राजापुरे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, नगरसेवक निलेश गाडेकर आदी उपास्थित होते.
कार्यक्रमासाठी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांच्या पत्नी सौ मनीषा कटके यांनीही धावती भेट देत उपस्थितांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
यावेळी खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये बक्षीसांकरिता प्राप्त झालेल्या सर्व प्रायोजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
ओम यादव यांच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमास २००० हुन अधिक महिला उपस्थित होत्या. या सर्वांना गुलाबाचे रोपटे भेट देण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांना “माझी वसुंधरा” ही शपथ देण्यात आली.
नारी सन्मान सोहळ्या निमित्त स्वाती विठ्ठल घावटे (सभापती, शिरूर पंचायत समिती यांना राजकीय क्षेत्र), उषा वाखारे (वात्सल्यसिंधू फाउंडेशन यांना सामाजिक क्षेत्र), शशिकला काळे यांना सामाजिक क्षेत्र, मानसी साकोरे (आय.पी.एस यांना प्रशासकीय क्षेत्र), कु. वैष्णवी वाखारे (ज्यूदो नॅशनल खेळाडू) व कु. ईश्वरी पाचुंदकर (कुस्ती, नॅशनल खेळाडू यांना क्रीडा क्षेत्र), महेक शेख (MHMS, गोल्ड मेड्लीस्ट, काकासाहेब म्हस्के कॉलेज) यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये करीत असलेल्या कामगिरीबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून माझी वसुंधरा बाबत केलेल्या कामगिरीबद्दल माहिती दिली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद व उपसभापती स्वप्नाली जामदार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे व उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांनीही आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
तदनंतर ओम यादव यांचे मार्फत महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. सदर खेळ पैठणीचा कार्यक्रमासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक इलेक्ट्रिक बाईक – नगरसेवक अभिजित पाचर्णे, सुनील जाधव, एजाज बागवान, निलेश गाडेकर, तुषार मांडगे यांच्याकडून देण्यात आले होते. तर पैठणी साड्या या सत्यनारायण सिल्क अँड सारीज यांच्याकडून , द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणजे फ्रीज हे नगरसेवक सागर नरवडे, पूजा पोटावळे यांच्याकडून देण्यात आले होते. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक एल.ई.डी. टि.व्ही. हा मे. गांधी कन्स्ट्रक्शन्स, चौथ्या क्रमांकाचे परितोषिक कुलर हे उपनगराध्यक्ष मितेश गादिया, पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक ज्यूसर हे बोराडे अॅन्ड कंपनी यांच्याकडून, सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक ज्वेलरी सेट्स हे जयश्री रसाळ यांच्या लिशास् दागिना, सातव्या क्रमांकाचे पारितोषिक डिनर सेट हे मे. स्वप्नील पोटघन, आठव्या क्रमांकाचे पारितोषिक पैठणी या सत्यनारायण सिल्क्स, नवव्या क्रमांकाचे पारितोषिक पैठणी या मे. अनुराधा कलेक्शन, दहाव्या क्रमांकाचे पारितोषिक मिक्सर हे बक्षीस अब्दुलभाई स्टोव्हवाले, तर पहिल्या ५१ महिलांना बेडशीट भेट मे. अनुराधा कलेक्शन यांच्याकडून देण्यात आले होते. तर रासने बंधू, धरमचंद भवरीलाल सराफ अॅन्ड ज्वेलर्स यांचे कडून स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आली होती.
खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाचे प्रथम पारितोषिक म्हणजे इलेक्ट्रिक बाईक, ही सौ निशा माधव सानप, द्वितीय पारितोषिक फ्रीज सौ. काजल संदीप वाघ, तृतीय पारितोषिक एल.ई.डी. टीव्ही सौ. आशिका दीपक राठोड यांना मिळाले.
सदर कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, शिरूर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.