संपादकीय

क्षीरसागर हॉस्पिटल जवळ लागलेली आग शिरूर नपाच्या अग्निशमनने त्वरित विझविली

शिरूर नपा ची अग्निशमन यंत्रणा सक्षम : सचिन वाळुंज, अग्निशमन अधिकारी

0 0 8 2 3 4

*शिरूर नपा ची अग्निशमन यंत्रणा सक्षम : अग्निशमन अधिकारी*
——-
शिरूर दि. 24/07/2026.
——-

शिरूर शहरातील कोर्ट परिसरात असणाऱ्या व डॉ क्षीरसागर हॉस्पिटल जवळील डीपी मध्ये आग लागल्याची घटना, शुक्रवार दि. 24/07/2026 रोजी सकाळी घडली. त्या संबंधी सजग नागरिकांनी शिरूर नगर परिषदेला ही घटना सांगताच, शिरूर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी सचिन वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली, फायरमन स्वप्नील पवार, वाहन चालक संतोष मोरे व रोहित इंगळे यांनी त्वरित पोचून आग विझविली. तसेच सदर ठिकाणी महावितरण कर्मचारी उपस्थित होऊन त्यांनी वीज सप्लाई बंद केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमन जवानांनी आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.
अग्निशमन अधिकारी सचिन वाळुंज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर नगर परिषद हद्दीत जर कुठे आग लागली, तर आपल्या नगर परिषदेकडे सध्या आग विझविण्याची दोन वाहने आहेत. एक छोटे नवीन वाहन असून त्याची क्षमता 300 लिटर असून ते वाहन गल्ली बोळात सहज जाते. तर दुसरे वाहन हे मोठे असून त्यात 3000 लिटर पाणी बसते. हे मोठे वाहन जुने झाल्याने आणखी एका नवीन वाहनाची मागणी केलेली आहे.
तसेच शिरूर नगर परिषद हद्दीच्या बाहेर जर आग लागली असेल, तर काही रक्कम घेऊन आपले वाहन आग विझविण्यासाठी जाण्याची तरतूद आहे. तसेच अशा काही घटना घडल्यास दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचेही आवाहन त्यांनी केलेय.
अग्निशमन अधिकारी, सचिन वाळुंज : 9922789405,

  1. महेश कदम, अग्निशमन सहाय्यक (9922361946).
5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे