गुन्हेगारी

बांगलादेशी तरुणीला रांजणगाव पोलीस व एटीएस च्या पथकाने घेतले ताब्यात

0 0 2 9 7 7

*रांजणगाव येथे एटीएस च्या कारवाईत बांगलादेशी तरुणी ताब्यात*
—————

शिरूर : दि. 04/03/2026.
बातमी : रवींद्र खुडे, संपादक
9422 650 735..

—————

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात छापा टाकून एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले आहे. या आधीही काही महिन्यांपूर्वी कारेगाव व शिरूर तालुक्यातून बांगलादेशिंना पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते.
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला एक बांगलादेशी तरुणी पुणे जिल्ह्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे तिची ओळख लपवून बनावट नावाने राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने वेषांतर करुन कारेगाव येथील आजूबाजूचे लोकांकडून माहिती काढून सदर तरुणीचा ठावठिकाणा शोधला. रांजणगाव पोलीसांचे मदतीने सदर संशयित महिलेच्या घरावर छापा टाकून तीला ताब्यात घेण्यात आलेय. सदर बांगलादेशी तरुणी ही तिचे नाव बदलून बेकायदेशीरपणे राहत होती. विशेष म्हणजे ती बांगलादेश येथील तिचे नातेवाईक यांचे संपर्कात असल्याचेही चौकशीत निष्पन्न झालेले आहे.
सदर बांगलादेशीय तरुणी ही भारतात कशी आली? ती यापूर्वी कोठे राहिली ? तसेच तिला बेकायदेशीर राहणेसाठी कोणी कोणी मदत केली ?याबाबत अधिक तपास चालू असून, तिला बेकायदेशीरपणे राहण्यास मदत करणारे यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
सदर बांगलादेशी तरुणीला पुढील कारवाईसाठी रांजणगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून, याबाबतचा अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे करीत आहेत.

सदर कारवाई ही पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, विशाल भोरडे, रवींद्र जाधव, ओंकार शिंदे, गणेश चंदनशिव, महिला पो. कॉ. आर. डी. भोजने यांचे पथकाने केलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 9 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे