आरोग्य व शिक्षण

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत शिरूर ग्रामीण रुग्णालयाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर

सार्वजनिक आरोग्य विभागाचा स्तुत्य ऊपक्रम

0 0 8 2 3 4

*राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत शिरूर ग्रामीण रुग्णालयाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर*
——–
बातमी : रविंद्र खुडे, संपादक, खुडेज टूडेज न्यूज.
दि. 24/07/2026.
——-

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम” अंतर्गत, शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, मोतीनाला (शिरूर) येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी, शिरूर नपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा कलीम सय्यद, झोपडपट्टी विकास व पुनर्वसन समिती सभापती स्वाती चेतन साठे व नगरसेविका संगीता महेंद्र मल्लाव, संजय भटेवरा, बाबुराव पाचंगे, शशिकांत शिर्के, संजय जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यात क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-

1) प्रथम क्रमांक – कु. श्रेया गाडेकर (विद्याधाम प्रशाला शिरूर)
2) द्वितीय क्रमांक – कु. कादंबरी नरवडे (डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळा, शिरूर)
3) तृतीय क्रमांक – कु. अष्टमी वायकुळे (प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, शिरूर)
4) चतुर्थ क्रमांक – कु. श्रेया सातपुते (ज्ञानगंगा स्कूल, शिरूर)
5) पाचवा क्रमांक – कुमार सागर मंडाळे (संत ज्ञानेश्वर विद्यालय)

तर उत्तेजनार्थ पारितोषिके :-
1) कु. भारती जाधव – आश्रम शाळा, शिरूर.
2) कु. आदिती वाव्हळ, विद्याधाम प्रशाला, शिरूर.
3) कु. संस्कृती नरवडे, डेक्कन स्कूल, शिरूर.

विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख स्वरूपात बक्षीसही देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली.

सदरील परीक्षेचे परीक्षण सुरेश शिंदे सर, तसेच निता गायकवाड मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमशाळेचे विजय लगड सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे एन. सी. डी. समुपदेशक राजेश कोंडू जाधव यांनी मानले.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे