डॉ प्रतीक पांडुरंग गायकवाड यांची आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मा. ना. दिलीपराव वळसे पा. यांच्या हस्ते सत्कार


डॉ प्रतिक पांडुरंग गायकवाड यांची, “आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन”च्या, २०२६ – २७ वर्किंग कार्यकारिणीच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली आहे. या निवडीसंदर्भातील बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. डॉ सोमेश्वर टाके यांनी मनापासून त्यास पाठिंबा दिला. डॉ प्रतीक ही जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडतील. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे, त्यांनी लवकरात लवकर आपली कमिटी तयार करून कामकाजास सुरुवात करावी असेही त्यांनी यावेळी मत मांडले.
यावेळी बोलताना डॉ प्रतीक यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी योग्य पद्धतीने व सर्वांचा विचार घेऊन पार पडणार असल्याचे सांगत, डॉ किरण, डॉ सुहास, सर्व सभासद, तसेच ट्रस्ट मेम्बर्स व सर्व सहकाऱ्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल आभार मानले.
तर या निवडीबद्दल रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी, महाराष्ट्र राज्याचे माजी गृह मंत्री, आंबेगाव शिरूरचे विद्यमान आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील, जि. प. पुणे चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जि. प. सदस्य विष्णूकाका हिंगे, शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या शुभहस्ते डॉ. प्रतिक पांडुरंग गायकवाड, यांची आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.